मोठा वाघोदा येथे बेजबाबदार दांडीबाज सरपंच व बेफिकिरी प्रशासनामुळे कोरोनाचा शिरकावं एका महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह
कुटुंबातील १४ सदस्यांना स्वॅब तपासणी करीता रावेर ला रवाना
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा
मोठा वाघोदा तालुका रावेर येथील रजा कॉलनी तील जवळपास ५२ वर्ष वय असलेल्या रहिवासी महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज ९ रोजी प्राप्त झाला असल्याने कोरोना मुक्त मोठा वाघोदा गावात बेपर्वा बेजबाबदार लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना गावकर्यांना वार्यावर सोडूऩ नागरिकांच्या जिवाशी काळजी काही एक काळ्जी नसलेल्या कोरोना मुक्त मोठा वाघोद्यात अखेर कोरोना या महाभयंकर रोगाने प्रवेश केल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून प्रांताधिकारी फैजपूर अजित थोरबोले तहसिलदार उषारानी देवगुणे यांचे आदेशान्वये आरोग्य प्रशासनाचे अधिकारी सावदा पोलिस स्टेशनचे पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व कर्मचारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच,सदस्य व कर्मचारी यांनी संबंधित महिलेचा रहिवासी परिसर (कंटेंन्टमेंट झोन)सील केला आहे व पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त महिलेच्या संपर्क आलेल्या कुटुंबातील १४ जणांना स्वॅब तपासणी करण्यासाठी रावेर येथील कोरोना सेंटरला क्वारंटाईन करण्यात आले आहेत.






