सावदा येथील प्रतिष्ठित केळी उद्योजक कोरोना ला मात देऊन घरी परतले
कोरोना योध्दाचे सावदा येथे जंगी स्वागत
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
रावेर तालुक्यातील सावदा येथील रहिवाशी व सुप्रसिद्ध केळी व्यवसायिक हे कोरोना आजारावर मात करून आज दि 06/06/2020 रोजी सुखरूप परतले आहे. त्यांचे आगमन प्रित्यर्थ नातेवाईक , मित्र परिवार व आपत्येषठांनी पुष्प छिडकाव व हार घालून त्यांचे जंगी स्वागत केले.आलेले व्यकती काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांचेसह सावदेकरांना दिलासा मिळाला आहे .त्यांच्यावर जळगांव येथे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते ,त्यांना रुग्णालयातून आज दुपारी घरी पाठवण्यात आले ,बरे होऊन येणारे हे शहरातील पहिलेच रुग्ण असून त्यांचे कुटुंबियांनसह मित्र मंडळींनी त्यांचे जंगी स्वागत केले.सावदा येथील उपचार करून सुखरूप परत येणारे हे पहिलेच व्यकती असल्या ने नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात ३२ रुग्ण असून सहा मयत झाले आहे.
प्रशंसनीय
एकी कडे कोरोना आजाराचा संकट व दुसरी कडे कोरोना बाधित व्यकतींचा कुटुंब संभाळून उपचार करणारे आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे तोंड भरून कौतुक ही केले जात आहे.






