Maharashtra

जळगाव जिल्ह्यात आणखी 44 कोरोनाबाधित आढळले

जळगाव जिल्ह्यात आणखी 44 कोरोनाबाधित आढळले ! रुग्णसंख्या हजाराच्या पार

प्रतिनिधी नूर खान

जळगाव जिल्ह्यात एकीकडे दिलासादायक वृत्त असताना अजून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात आज पुन्हा नव्याने कोरोना संशयितांची 44 जणांची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रुग्ण संख्या 1001 वर पोहचली आहे. जळगाव 5, अमळनेर 10, रावेर 6, एरंडोल 1, भडगाव 1, जामनेर 2 , भुसावळ 5 ,चोपडा 9, धरणगाव 4 असे एकूण 44 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काल 50 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तसेच 115 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 392 रुग्ण उपचार घेत असून 448 जण कोरोनामुक्त होऊन घरी बरे होऊन परतले आहेत. 40 रुग्ण अत्यवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button