सावदा पालिकेच्या सन 1919- 2020. वर्षाचे राखीव अनुदान विकलांग नागरिकांना फंडातुन देण्याची मागणी – विरोधीगटनेते, नगरसेवक फिरोजखान पठाण
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
(सा वा )आज जगासह भारतावर आलेले कोराना सारखे संकट हे आज आपल्या घरापर्यंत येऊन पोहचले आहे. याताच कोराना सारखे हे संकट जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आले व काही दिवसांपूर्वी च सावदा शहरात कोरानाचा शिरकाव झाला व सावदा शहरवासियांची झोप च उडाली. कोराना सारखे संकट हे सावदा शहरात येणे म्हणजेच चिंता वाढवण्याचे काम झाले. या सर्व गोष्टींचा विचार व अभ्यास करून शहरासाठी काही तरी आपल्या पर्यायाने करू व कोराना सारख्या संकटापासून आपल्या शहरातील विकलांग नागरीकांना वाचवु ह्या उद्देशाने येथील विरोधी गटनेते नगरसेवक फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बहुतेक सर्वच व्यवहार बंद ठेवून सर्वजण कोरोनाशी लढाई लढत आहे. त्यामुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने हात मजूरवर्गाला तसेच विकलांग नागरिकांना उदरनिर्वाह साठी मोठे अडचणीत जात आहेत. त्यांची अडचण दुर व्हायला आपल्या नगरपालिकेतील फंडातुन सन 2019 – 2020 वर्षाचे राखीव अनुदान तिन महिने उलटूनही वाटप करण्यात आलेले नाहीत. तरी विकलांग नागरिकांना त्यांच्या हक्काचा फंड दिला तर कोरोनाच्या लाँकडाऊन च्या काळात त्यांना तो उदरनिर्वाह कामात येईल. म्हणून विकलांग नागरिकांना पालिकेच्या फंडातील राखीव अनुदान त्वरित देण्यात यावे अशी मागणी विरोधी गटनेते नगरसेवक फिरोजखान पठाण यांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शेवटी निवेदनाद्वारे सुचित केले आहे की, सध्या शहरासाठी पिण्याच्या पाणीपुरवठा गढूळ प्रमाणात होत आहे. शहरात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी टिडिएस घेऊन पाणी पुरवठा करण्यात यावा. असेही निवेदनात त्यांनी म्हटले आहे.






