Motha Waghoda

ग्रामविकास अधिकारी दर्जाच्या मोठा वाघोदा ग्रामपंचायती त ग्रामसेवकांची नियुक्ती

ग्रामविकास अधिकारी दर्जाच्या मोठा वाघोदा ग्रामपंचायती त ग्रामसेवकांची नियुक्ती

मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार.चंद्रकांत पाटील यांनी जातीने लक्ष घालून कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी ची नियुक्ती करावी तसेच दांडी बहाद्दर लोकनियुक्त सरपंच प्रकरणी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी गावकर्यांतून होत आहे

प्रतिनिधी मुबारक तडवी

ग्रामसेवक देणार एक दिवसाआड हजेरी
मोठ्या लोकसंख्येच्या गावाच्या समश्यांचे आवाहन पेलवतील काय?
मोठा वाघोदा येथील ९ हजार लोकसंख्या असलेल्या लोकनियुक्त सरपंच सहीत १७ सदस्यिय ग्रामपंचायतीचे कामकाज व कारभार ग्रामविकास अधिकारी दर्जाच्या अधिकारी हाताळतात मात्र मोठा वाघोदा ग्रामपंचायती त ग्रामसेवकांची नियुक्ती गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर यांनी दिली.तरी ग्रामविकास अधिकारी ऐवजी ग्रामसेवक यांची नियुक्ती करुन गावातील समश्यांचे निरसन होणार काय? तसेच ग्रामसेवक यांचेवर तात्पुरता कार्यभार दिला गेला असल्याने ते ग्रामपंचायतीत दररोज हजर राहतील का? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.त्यातच प्रभारी ग्रामसेवक असल्याने एका दिवसाआड ग्रामपंचायतीला उपस्थिती दिली तर दुष्काळात तेरावा महिना लोकनियुक्त सरपंच सह ग्रामसेवकांना ही गावकर्यांचे काही एक सोयरसुतक नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही मुदत संपुनही लोकनियुक्त सरपंच यांनी निवडणूक विभागाकडे त्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यामुळे अपात्र होणेचे भितीपोटी ग्रामपंचायतीला उपस्थित राहणे ऐवजी दांडी मारत आहेत तर दुसरीकडे ग्रामविकास अधिकारी दर्जाच्या ग्रामपंचायतीचे कारभार ग्रामसेवकांचे हाती पंचायत समिती रावेर यांनी दिले याचाच अर्थ आंधळा दळतोय नि कुत्रा पिठं खातोय अशी बिकट अवस्था मोठा वाघोदा ग्रामपंचायती ची झाली असून मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार.चंद्रकांत पाटील यांनी जातीने लक्ष घालून कायमस्वरूपीज्ञ ग्रामविकास अधिकारी ची नियुक्ती करावी तसेच दांडी बहाद्दर लोकनियुक्त सरपंच प्रकरणी दखल घेऊन मोठा वाघोदा वासियांना यातनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत यांसह ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांना रामभरोसे सोडणार्या बेफिकिरी निष्क्रिय लोकनियुक्त सरपंच यांचे वर जिल्हाधिकारी जळगांव कायदेशीर कारवाई करुन पदमुक्त करावे अशी विनंती वजा मागणीही मोठा वाघोदा वासियांतून होते आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button