Maharashtra

दोनशे युनीट पर्यंत चे विज बिल माफ करण्यात यावे पातूर तहसीलदार यांना निवेदन

दोनशे युनीट पर्यंत चे विज बिल
माफ करण्यात यावे- पातूर तहसीलदार यांना निवेदन

पातूर: ता प्रतिनिधि विलास धोंगडे

कोरोना चे महामारी चे संकटामुळे सर्व गोर गरीब जनता हवालदिल झाली आहे
व्यवहार ठप्प झाली आहे, व्यापार बंद आहे आर्थिक परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे
त्यामुळे200युनिट पर्यंत चे वीजबिल माफ़ करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन आम आदमी पार्टी चे वतीने पातूर तहसीलदार दिपक बाजड यांच्या
मार्फत मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना 3जून रोजी देण्यात आले आहे
निवेदन देणाऱ्या शिष्ट मंडळात आम आदमी पार्टी चे बाळापूर विधानसभा संयोजक देवानंद गहिले, पातूर तालुका संयोजक रुस्तमशाह इमान शाह ,तालुका सचिव गजानन गाडगे, अब्दुल सलाम अब्दुल नबी, सैय्यद हसन बाबू, सैय्यद इस्माईल खान उर्फ फज्जू भाई ,इमदाद उल्ला खान ऊर्फ कालुभाई, राहील इकबाल, राजू देवकर, प्रवीण खोकले आदि उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button