Maharashtra

कोरोनामुळे त्रस्त जनतेचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करा

कोरोनामुळे त्रस्त जनतेचे तीन महिन्याचे वीजबिल माफ करा – आम आदमी पार्टी चे राज्यव्यापी आंदोलनात चिमूर विधानसभेतील जनतेचा सक्रीय सहभाग

प्रतिनिधी ज्ञानेशवेर जुमनाके

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदीत अनेक उद्योग-व्यवसाय, नोकरी बंद असल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. मागील तीन महिन्यांपासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्यामुळे जनतेची आर्थिक कुचंबना झालेली आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक आवक नसल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून सर्वसाधारण जनता होरपळून निघाली आहे. अश्या परिस्थितीत शासनाने जनतेचे २०० युनिट पर्यंतचे किंवा एकूण तीन महिन्याचे वीजबिल माफ करून सहानुभूती दाखवावी याकरिता आज दि. ३ जुन ला सामाजिक प्रसार माध्यमाद्वारे आंदोलन केले गेले.

सामाजिक प्रसार माध्यमांवर विडीओ आणि फोटो प्रसारित करून जनजागृती करण्यात आली. यामध्ये चिमूर-नागभीड विधानसभेतील जनतेनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या मार्गदर्शनात चिमूर-नागभीड विधानसभेत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत, तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

आम आदमी पार्टी चे पदाधिकारी आदित्य पिसे, सुरेशजी कोल्हे, मंगेश शेंडे, विशाल इंदोरकर, विशाल बारस्कर, पराग वाळके, रूपेश घोनमोड़े यांनी चिमूर येथे तहसीलदार यांची भेट घेवून निवेदन दिले. आम आदमी पार्टी च्या अनेक स्वयंसेवकांनी चिमूर-नागभीड विधानसभेत सामाजिक प्रसार माध्यमांवर विडीओ व फोटो प्रसारित करून जनजागृती केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button