पिंपळगाव बसवंत बाजार समितीत नियमांचे पालन करून टोमॅटो विक्री सुरु करणार
नाशिका जिल्हा प्रतिनिधी ,शांताराम दुनबळे यांजकडून
आमदार दिलीपराव बनकर यांचे आवाहन,,
: कमी कालावधीत चांगले आर्थिक उत्पन्न मिळुन देणारे पीक म्हणून टोमॅटो पिकाची लागवड केली जाते. नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड, दिंडोरी तर काही प्रमाणात येवला, सिन्नर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड केली जाते. टोमॅटो पिकाच्या खरेदीसाठी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परराज्यातून व्यापारी येत असतात. पिंपळगाव बाजार समिती सर्वात जास्त टोमॅटो मालाची खरेदी विक्री होत असते. बाजार समितीत दररोज दीड ते दोन लाख कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी विक्री येतात. काही दिवसापूर्वी टोमॅटो खाल्याने कोरोना होतो अशी अफवा पसरलेली होती तसेच यावर्षीच्या हंगामात कोरोनामुळे व्यापारी खरेदीसाठी बाजार समितीत येणार नाही त्यामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होईल अशा प्रकारचा गैरसमज शेतकऱ्यांमध्ये प्रसारला असून व्यापारी येणार नाही हि केवळ अफवा असून सालाबाद प्रमाणे शेतकऱ्यांनी यंदाही टोमॅटोची लागवड करावी. पिंपळगाव बाजार समितीच्या वतीने नेहमीप्रमाणे नियोजन केले असून बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक टोमॅटो कॅरेटची विक्री निश्चित होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवावार विश्वास न ठेवता टोमॅटोची लागवड करावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती आमदार दिलीपराव बनकर उपसभापती दीपक बोरस्ते व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले.






