राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अॅड दीपक पवार तर शहराध्यक्षपदी सुधीर भाऊ भोसले यांची फेरनिवड
प्रतिनिधी रफीक आत्तार
गेले ३ वर्षापासून पक्षाध्यक्ष लोकनेते मा शरदचंद्रजी पवार साहेब उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष ना जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर जिल्हा अध्यक्ष बळीराम काका साठे कार्याध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले पंढरपूर शहर व तालुकामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात आली व त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर शहर व ग्रामीण भागातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचा मतधिक्य मिळाले त्याची पोचपावती म्हणूनच दोघांना पुन्हा संधी मिळाली या निवडीमुळे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे
आमदार भारत नाना भालके प्रतीक सदस्य राजाबापू पाटील जिल्हा उपाध्यक्ष युवराज दादा पाटील यांनी निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केले यावेळी जिल्हा सचिव लतीफ भाई तांबोळी खजिनदार राजेंद्र हजारे मा उपसभापती मानाजी माने उपस्थित होते






