Maharashtra

इलेक्ट्रीक वायरमन व कर्मचाऱ्यांना मनसेची मदत

इलेक्ट्रीक वायरमन व कर्मचाऱ्यांना मनसेची मदत

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर,ता 30 – कोरोनामुळे सर्वच व्यवसायिक आणि त्यावर काम करणारे कर्मचारी आणि मजूर संकटात आले आहेत. बांधकाम क्षेत्राशी सलग्न असणारे इतर व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातील शेकडो तरुण बेरोजगार झाले आहेत. यामध्ये खासगी इलेक्ट्रीक वायरमन, कर्मचारी आणि प्लबिंग करणारे कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू व गरीब इलेक्ट्रीक खासगी वायरमन आणि कर्मचाऱ्यांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केेले.दोन महिन्यानंतरतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दरम्यानच्या काळात लाॅकडाऊनने अनेक छोटेमोठे उद्योग आणि व्यवसाय बंद आहेत. त्यातच शेतीवर आधारीत अनेक उद्योग व व्यवसाय देखील ठप्प झाले आहेत. परिणामी अनेक इतर छोट्या व्यवसायिकांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे.यामध्ये खासगी इलेक्ट्रीक वायरमन आणि कर्मचारी अधिक अडचणीत आली आहेत. हौसींग सोसायट्या, बंगले, रो हाऊससह इतर अनेक गृह प्रकल्प सध्या बंद आहेत. त्यामुळे इलेक्ट्रीक व्यवसाय देखील बंद आहे. या व्यवसायावर शहरातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. परंतु मागील दोन महिन्यांपासून कामधंदा मिळत नसल्याने गरीब व गरजू वायमन, कर्मचारी आणि प्लबिंगचे कारागिरांना मदतीची आवश्यकता होती.त्यांची ही गरज ओळखून मसनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी गरीब व गरजू कुटुंबांना आज गहू,तांदुळ,साखर, तेल, पोहे, शेंगदाणे आदीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी मनसेेच तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, सागर घोडके,समाधान डुबल,अर्जून मेटकरी, प्रशांत जगताप, अमोल शिंदे,संजय भागानगरे,रफिक पठाण, आप्पा स्वामी आदी उपस्थित होते 

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button