Maharashtra

मरीआई समाज बांधवांना मनसेची मदत

मरीआई समाज बांधवांना मनसेची मदत

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील अधुनिक जागात देखील अंधश्रध्देचा पगडा असलेल्या मरीआई समाज बांधवांना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या वतीने अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केेले.मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष देवानंद गुंड पाटील यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.
कोरोन विषाणूमुळे आता ग्रामीण भागात धास्ती वाढली आहे. लाॅकडाऊनमुळे तर अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.गावोगावी मरीआई देवीचा गाडा घेवून उदरनिर्वाह करणारे मरीआई समाज बांधवांवर संकट ओढवले आहे.जग 21 व्या शेतकाकडे जात असले तरी आजही अनेक समाज मागास आणि दुर्लक्षीत आहे. मराई समाजावर तर अनेक पिढ्यापासून अंधश्रध्देचा पगडा आहे.समाजापासून दूर असलेला समाज आजही गरीबीत जगत आहे. कोरोनामुळे तर या समाजीची दयनिय अवस्था झाली आहे. त्यांना आता गावात कोणीच दान करत नसल्याने त्यांच्या मुलाबाळांची उपासमार सुरु आहे.अशा संकट प्रसंगी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी तात्कळ आष्टी येथे जावून या समाज बांधवांना गहू,तांदुळ,साखर,तेल,शेंगदाणे,दाळीसह इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.जिल्हा काॅंग्रेसचे उपाध्यक्ष देवानंद गुुंड पाटील यांच्या हस्ते येथील गरजू आणि गरीब लोकांना मदतीचे वाटप करुन गोरगरीब लाेकांच्या प्रती असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, अष्टीचे युवक नेते ऋतुराज पाटील,दाजी शिंदे,सादिक शेख, समाधान डुबल,दुर्गा पवार,गीता देवकर,अमृता देवकर,बिजली पवार आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button