?️ पहा या अभिनेत्रींनी केले चुकीच्या वेळी विवाह आणि केले करियर बरबाद….
प्रा जयश्री दाभाडे
हल्लीच्या जमान्यात पंचवीस वर्ष झाल्याशिवाय मुलीसुद्धा लग्न करत नसल्याचे पाहायला मिळत आहे.बॉलिवूडमध्ये देखील यशोशिखरावर असताना अनेक अभिनेत्रींनी लग्न करून आपल्या करिअरवर पाणी सोडल्याचे पाहायला मिळते. लग्नानंतर या अभिनेत्री चित्रपटात तुरळकच दिसल्या.
या अभिनेत्रींनी यशाच्या शिखरावर असताना लग्न करून आपले करियर सोडून दिल्याचे पाहायला मिळते. तर कोण आहेत या अभिनेत्री आपण पाहू या…
1. माधुरी दीक्षित : माधुरी दीक्षित हिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करियरच्या सुरुवातीला तिचा तेजाब हा चित्रपट गाजला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटातून काम केले. काही काळ तिचे संजय दत्त बरोबर देखील नाव जोडले गेले होते. मात्र, अमेरिकेत स्थित असलेल्या श्रीराम नेने यांच्यासोबत तिने लग्न केले.
श्रीराम नेने यांना माधुरी अभिनेत्री आहे, हे देखील माहिती नव्हते. लग्नानंतर माधुरी काही वर्षे अमेरिकेत स्थायिक झाली. त्यानंतर तिने करियरवर पाणी सोडलं होते. मात्र, काही वर्षांनंतर ती परत मुंबईला येऊन स्थायिक झाली. आता ती तुरळक चित्रपटातून दिसते.
2. सोनाली बेंद्रे : अतिशय लोभस असणारी सोनाली बेंद्रे हिने मेजरसाब, हम साथ साथ है, सरफरोश या आणि इतर चित्रपटातून काम केले आहे. चित्रपटात तिची भूमिका विशेष गाजली. तिची अजय देवगनसोबतीची जोडी अतिशय हिट ठरली होती. सोनाली बेंद्रे तिच्या खाजगी आयुष्यात देखील चर्चेत होती. सोनाली बेंद्रेचे नाव अनेकंसोबत जोडल्या गेले. मात्र, शेवटी तिने दिग्दर्शक- निर्माता गोल्डी बहल यांच्यासोबत लग्न केले होते. काही वर्षांपूर्वी तिला कर्करोगाचे निदान झाले. त्यानंतर ती टीव्ही आणि रुपेरी पडद्यापासून लांबच आहे.
3.ट्विंकल खन्ना : ट्विंकल खन्ना हिने अनेक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये काम केले आहे. बॉबी देओलसोबत आलेला तिचा पहिलाच चित्रपट बरसात हा खूप गाजला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. अक्षय कुमारसोबत देखील तिने काही चित्रपटात काम केले. त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता टिंकल खन्ना चित्रपटांपासून दोन हात लांबच आहे.
4. काजोल : काजोल हिने देखील अनेक चित्रपटातून काम केले आहे. काजोल हिचा सुरुवातीचा बाजीगर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. यामध्ये शाहरुख खानसोबत तिची जोडी चांगलीच चर्चेत आली होती. अजय देवगनसोबत देखील तिने काही चित्रपटांतून काम केले. त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. एक दिवस अजय देवगनने काजोलला प्रपोज केले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या तानाजी या चित्रपटातून ती दिसली होती. हा एकमेव चित्रपट या वर्षाचा हिट चित्रपट आहे.
5.भाग्यश्री : भाग्यश्री हिने मैने प्यार किया या चित्रपटातून पदार्पण केले. हा चित्रपट बॉलीवुडसाठी माइलस्टोन ठरला होता. त्यानंतर तिने एक दोन चित्रपटात काम केले. मात्र, लगेच तिने हिमालय दासानी याच्यासोबत लग्न केले. हिमालय हा देखील अभिनेता आहे. भाग्यश्री ही मूळ सांगली येथील असून तिचा राजघराण्याशी संबंध आहे. भाग्यश्रीला दोन मुले आहेत. तिने वयाच्या १९ व्या वर्षी लग्न केले होते.
6. ऐश्वर्या राय बच्चन : ऐश्वर्या राय हिने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता आणि चित्रपटातून तिने भूमिका केल्या. सलमान खान, विवेक ओबेरायसोबत देखील तिचे अफेअर होते. मात्र, अभिषेक बच्चन सोबत तिने गुरु चित्रपट केला. त्यानंतर दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर ऐश्वर्याने लग्न केले. मात्र, सध्या ती चित्रपटापासून दूरच असल्याचे दिसते.
…अशाप्रकारे टॉपवर असलेल्या अभिनेत्रींनी लग्न करून आपले चित्रपट करिअर अर्धवट सोडले, असेच म्हणावे लागेल.






