Bollywood

?️ Breaking.. पहा सलमान खानचा वाहनचालक किती घेतो पगार

?️ Breaking.. सलमान खानचा वाहनचालक घेतो 24 तासाचे दरमहा 15 लाख रु पगार

बॉलिवूडमधला दबंग समजला जाणाऱ्या अभिनेता सलमान खानबरोबर एखाद्या सावलीप्रमाणे राहणार त्याचा अंगरक्षक शेरा हा बऱ्याचदा चर्चेत असतो. वास्तविक, शेरा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला होता. मुलाखतीत शेराने सलमान खानविषयी खुलेपणाने बोलले होते.

शेरा गेली 20 वर्षे सलमान खानकडे बॉडीगार्ड चे काम करत आहे. अलीकडेच शेराने सलमान खानबद्दल एक विधान केले असून तो सलमान खानच्या किती जवळ आहे हे त्यावरून सिद्ध होते. शेरा या मुलाखतीत म्हणाला – मी शेवटच्या श्वासापर्यंत भाईजान (सलमान) सोबत राहील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी भाईजान सोबत राहील.

शेरा म्हणाला की तो भाईजानच्या मागे कधी उभा राहत नाही. तो नेहमीच भाईजानांसमोर उभा राहतो आणि येणारी प्रत्येक अडचण त्याच्यावर घेतो असे शेरा म्हणाला. शेराचा शोध सलमानचा भाऊ सोहेल खानने सलमानसाठी घेतला होता.

1995 मध्ये एका पार्टीदरम्यान शेराने सलमान खान आणि सोहेल खानची भेट घेतली. यानंतर एकदा सलमान खान चंदीगडला गेला जिथे तो गर्दीत सापडला होता. त्यानंतर सोहेलने असा विचार केला की सलमान भाईला चांगल्या बॉडीगार्डची गरज आहे. मग त्याच्या मनात शेराचे नाव आले.

मीडिया रिपोर्टनुसार शेराला सलमानच्या 24 तास सुरक्षेसाठी दरमहा 15 लाख रुपये पगार मिळतो. शेरा यांने 1993 मध्ये ‘टाइगर सिक्युरिटी’ नावाची कंपनी देखील उघडली. सोहेलने शेराशी संपर्क साधला आणि त्याला विचारले की ‘तू कायमच माझ्या भावासोबत राहशील का’. मग शेराने न विचार करता हो असे उत्तर दिले.

एका मुलाखतीत शेरा म्हणाला, ‘मालक माझ्यासाठी सर्व काही आहे. तो माझा देव आहे. मालक जिथे जातील तेथे मी त्यांच्याबरोबर आहे. मी त्यांना थोडीशी खरचट सुद्धा येऊ देत नाही. ‘

शेराचे खरे नाव शेरा नसून, गुरमीतसिंग जॉली असे आहे. शेरा हा शीख कुटुंबातील आहे. शेराला लहानपणापासूनच अभ्यास करुशी वाटत नव्हत. असो, त्याने शाळा पूर्ण केली. तो सुरुवातीपासूनच आपले शरीर तयार करण्याकडे विशेष लक्ष देत असे.

शेरा अनेक वेळा सलमान खानसाठी तुरूंगातही जाऊन आला आहे. जमावापासून सलमान खानला वाचवण्यासाठी तो नेहमी भांडण करतो. सलमान खानच्या कुटूंबाशी त्याचा असा संबंध आहे जो कायम तसाच राहील.

शेराला एक मुलगा आहे. ज्याचे नाव टायगर आहे. सलमान टायगरला आपला पुतण्या मानतो. बातमीनुसार सलमान टायगरला बॉलीवूडमध्ये लॉन्च करण्याची तयारी करत आहे. टायगरने सध्या बर्‍याच चित्रपट निर्मात्यांना असिस्ट केले आहे. तो अभिनय बारकाईने शिकत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button