Nashik

कामगारांना लॉकडाऊन कालावधीतील वेतन देण्याबाबत समन्वयातून निर्णय घ्या -पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन

कामगारांना लॉकडाऊन कालावधीतील वेतन देण्याबाबत समन्वयातून निर्णय घ्या -पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन

शांताराम दुनबळे

लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या व आस्थापना वगळता सर्व कंपन्या व आस्थापना बंद होत्या . या कालावधीत बंद असलेल्या कंपन्यांकडून कामगारांना पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत , या तक्रारींचे निराकरण करा व संबंधित कामगारांना या कालावधीतील वेतन कसे मिळेल याचे नियोजन करावे , कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्या समन्वयातून वेतन व पगार देण्याबाबत निर्णय घ्या अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह कामगार उपायुक्तांनादिल्या .लॉकडाऊन – चार घोषित झाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना रुग्ण नियंत्रणासह अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सर्व आस्थापना सुरू करताना योग्य नियोजन करण्यासह सर्वांना या संकटातून कसे बाहेर काढता येईल , यासाठी नियोजनाची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली . यावेळी त्यांना सूचना दिल्या . मालेगावचे पावरलूम बंद असल्यामुळे तेथील अर्थकारणावर व सर्व सामान्यांच्या जनजीवनावर परिणाम होत आहे . जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून पावरलूम चालक – मालक यांच्याशी चर्चा सुरू असून वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून पावरलूम कामगांराच्या समस्यांवर खावटी योजना अथवा सवलतीची योजना देण्याबाबतची शिफारस केली जाणार आहे . केवळ मालेगावच नाही , तर संपूर्ण जिल्ह्यातील परवानगी असलेले सर्वच उद्योग , व्यावसाय , दुकाने कशी सुरू करता येतील , त्यातून रोजगारनिर्मिती करण्यावरच सध्या भर देत असल्याचेही भुजबळांनी सांगितले . यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे , पोलिस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील , माहापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह , जि . प . मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विविध मुद्यांवर माहिती सादरीकरण केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button