AmalnerMaharashtra

“व्हेग”आकडेवारी च्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद.. चोराच्या मनात चांदणे ???

?️ “व्हेग”आकडेवारी च्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद.. चोराच्या मनात चांदणे ???

अमळनेर येथे काल प्रशासनातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत व्हेग आणि फेक आकडेवारी का येते आहे? ती खरी आहे की खोटी आहे? या विषयावर चर्चा करण्यात आली. फार काही आकडेवारी च्या संदर्भात लोकांमध्ये चर्चा नव्हती पण चोराच्या मनात चांदणे या म्हणी प्रमाणे सारवा सारव करण्यासाठी या पत्रकार परिषदेचे नियोजन करण्यात आले होते असे निदर्शनास आले.

पत्रकार ग्राउंड लेव्हल ला कार्यरत असतात आणि स्थानिक असल्या मुळे तालुक्याच्या काना कोपऱ्याची माहिती त्यांना असते.म्हणून अनेक लोक अधिकाऱ्यांशी संपर्क न साधता पत्रकारांशी संपर्क साधतात.या बाबतीत अधिकाऱ्यांना,प्रशासनाला माहिती दयावी तर पत्रकारांना व्हेग स्टेटमेंट करू नका असे म्हणतात. आमच्या कडे जो पर्यंत पुरावा येत नाही तो पर्यंत आम्ही बोलत नाही याची जाणीव अधिकारी आणि प्रशासनाला असणे आवश्यक आहे. विना कारण विरोधाला विरोध करायचा ,कोणाचं तरी ऐकून किंवा म्हणण्यानुसार आपलं मत बनवायचं हे अधिकाऱ्यांना शोभत नाही आम्ही त्यांच्याशी नाही बोलत तर त्या खुर्चीशी बोलतो.

एकंदरीतच कालची पत्रकार परिषद ही डोक्यात आकडेवारी ची व्हेग माहिती पसरविली गेली म्हणून सारवा सारव करण्यासाठी होती आणि विशेष म्हणजे व्हेग हा शब्द डोक्यात होताच त्यामुळे तो मानस शास्त्रीय निकषा नुसार बरोबर बाहेर आला त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button