नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील तळेगांव दिंडोरी पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यु.
सुनील घुमरे
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील रहिवासी दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकणारा कु यश कांतिलाल उगले (१४) तळेगांव दिंडोरी बिरोबा येथे विहिरीवर पोहण्यासाठी गेला मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याने गावांत हळहळ व्यक्त केली जात असून यश हा पोहण्यासाठी कुणालाही न सांगता एकटाच गेल्याने आईने यश घरी न परतल्याने गावात सायंकाळच्या वेळेस शोधा शोध सुरु केली. तरीही यश गावात कुठेही सापडला नाही संपुर्ण राञ यशच्या मातोश्री सुरेखा उगले या राञभर जागीच होत्या. एकुलता एक मुलगा असल्याने त्यांना यशची चिंता वाढु लागली . दुसरे दिवशी सकाळी यश विहिरीकडे जाताना दिसला होता अशी कुणकुण लागताच गावातील नागरिक बिरोबा येथील विहिरी जवळ गेले माञ यशला विहिरीच्या पाण्यात शोधणार कोण तेव्हा पिंपळगाव केतकी येथील पट्टीचे पोहणार रामदास व्यक्तिला पाचारण केले रामदास यांचे पाण्यातील मृतदेह काढणे हे पहिलेच काम नाही तर पाण्यात बुडलेले मृत व्यक्ती पाण्यातुन शोधुन आणणे त्यांच्यासाठी कठीण काम नव्हते .
रामदास बिरोबा येथील विहीरीत गेले व त्यांनी पहिल्याच डुबकी मध्ये यशचा मृतदेह वरती घेऊन आले . या अगोदरही तळेगाव दिं येथिल अशीच एक घटना घडली होती त्या वेळेस ही रामदास यांनीच मृतदेह पाण्याबाहेर काढुन दिला होता . रामदास सांगतात की हे सुद्धा महत्त्वाचे व पुण्याचे काम आहे म्हणुन तर मी करतो माझ्या सारख्या पट्टीच्या पोहनाऱ्या नागरिकांनीही पाण्यात बुडालेल्या नागरिकांना पाण्याबाहेर काढणे असे काम करावे .यश च्या मृत्यू ने गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे.






