वणी नांदुरी सप्तशृंगी गड सप्तशृंगी गड साडेतीन पीठांपैकी एक जागृत देवस्थान सप्तशृंगी देवी माता
सुनील घुमरे
साडेतीनपीठांपैकी जिल्ह्यातील प्रसिध्द असे अर्धे पीठ म्हणून ओळखले जाणारे सप्तश्रृंग गडावरील सप्तश्रृंगी देवी मंदिर संस्थान कोरोना जनजागृती व लॉकडाउन काळात सामान्यांच्या मदतीसाठी पुढे आले जिल्ह्यातील ग्रामिण भागातदेखील कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्याने या विश्वस्त मंडळाने कोरोनाबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे तसेच गरजूंना आवश्यक ती मदत देण्याचा विडा उचलला असून गेल्या १८ मार्चपासून मंदीर भाविकांसाठी बंद करण्यात येत आहे. विश्वस्त मंडळाने मंदिरामध्ये दोनशेपैकी केवळ निम्मेच कर्मचारी यांना शिफ्टनुसार कामावर नियुक्त केले आहे, उर्वरित कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आली आहे. मार्चपासून या कामासाठी महिन्याकाठी ५० लाख रूपयांचा खर्च सुरू असल्याचे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सांगितले.ट्रस्टमध्ये व मंदिरात काम करणारया कर्मचऱ्यांना पगार, अन्नदान, मंदिर देखरेख, पूजा, धार्मिक विधींसह सामाजिक कल्याणकारी कामे आदींसाठी दरमहा ५० लाखांच्या आसपास खर्च होत आहे.
चैत्रोत्सव २०२०च्या नियोजनाचा भाग म्हणून १ मार्च २०२० पूर्वीच कोरोना विषाणू संसर्ग, आरोग्य जनजागृती अभियान सुरू केले होते. यात फेसबुक, व्हॉटस्अॅप व फ्लेक्स अशा विविध माध्यमातून भाविक, स्थानिक आणि कर्मचारी वर्गाला कोविड-19 बाबत प्रबोधन केले आहे. धर्मार्थ रु ग्णालय येथून सर्वांसाठी सातत्यपूर्वक मोफत वैद्यकीय उपचार व रु ग्णवाहिका सुविधा सुरू आहे. सर्व कर्मचारी वर्गासाठी तसेच रु ग्णाच्या आवश्यकतेनुसार मास्क, हॅड्ग्लोज, सॅनिटायझर व व्हिटामिन ‘सी’ ची औषधे आदींचे वाटप देखील करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ साठी २१ लक्ष रूपये मदत देवून सामाजिक बांधिलकी जपलेलेली आहे. कळवण येथील आरोग्य विभाग, पोलीस व महसूल विभाग अंतर्गत कार्यरत पदाधिकारी व कर्मचारी वर्गाला विशेष मदत म्हणून ७५०० मास्क, ७५००हॅन्डग्लोज व अर्धा लिटर क्षमतेच्या २२५ सॅनिटायझरच्या बाटल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये बहुतांशी साहित्य हे ट्रस्टने खरेदी केले असले तरी काही प्रमाणात दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी सॅनिटायझर साहित्य अर्पण स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. तसेच महसूल, पोलीस व इतर शासकीय विभागाने आवश्यकतेनुसार केलेले आवाहन, मदत बाबतची पूर्तता करणेकमी निशुल्क प्रकारात वाहन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
लॉकडाऊन काळात ट्रस्टने स्थानिक गरजु ग्रामस्थांसाठी दैनंदिन स्वरूपात ३० मार्चपासून सातत्याने २वेळेचे मोफत अन्नदान सुरू ठेवले आहे. याचा लाभ सुमारे दीड हजार लोक अन्नदानाचा लाभ घेत आहेत. तसेच मौजे सप्तशृंगगड येथील वन व महसूल हद्दीत जसे की, सीताकडा, शिवालय तीर्थ परिसर, चंडिकापूर मार्ग पायी रस्ता गणपती घाट, श्री भगवती मंदिर तसेच घाट रस्त्यादरम्यान असलेल्या पशुपक्ष्यांसह मासे आदी प्रकारातील मुक्या जीवांसाठी सातत्यपुर्वक विविध प्रकारची फळे, धान्य आणि खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहे. त्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. अन्नदान व पशु-पक्षी साठी ट्रस्टच्या आवाहन विचारात घेता काही दानशूर व्यक्तींनी साहित्य स्वरूपात गहू, भाजीपाला, फळे काहीश्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत.






