हॉटस्पॉट मध्ये सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत खा .डॉ .भारती पवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नाशिक सुनील घुमरे
जगभर कोरोना व्हायरस चा कहर सुरू असताना नाशिक जिल्ह्यात हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, तर एकीकडे या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पोलिस यंत्रणा अहोरात्रपणे आपल्या जिवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. काही नागरिकांकडून शासनाने लावून दिलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारचे पालन होत नाही. त्याचा त्रास तेथे सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे त्यामुळे आतापर्यंत जवळपास 100 हून अधिक पोलिस कर्मचारी कोरोना विषाणूच्या संसर्गात विषाणूच्या संसर्गाला बळी पडले आहेत .पोलीस त्यांचे तुकडीतील कोणत्याही एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची तपासणी केली जात नसून त्यांच्याकडून पुन्हा सेवा करून घेत असल्याचे प्रथमदर्शनी समजते त्यामुळे मालेगाव मध्ये सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ठराविक वेळेनंतर काही काळाकरता त्यांचे ठिकाणी दुसर्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व सेवा बजावत असणाऱ्या पहिल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरी सोडण्या अगोदर त्यांची कोरोना तपासणी करून मगच घरी सोडावे.
हॉटस्पॉट परिसरात सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी अशी मागणी असताना देखील टेस्ट केली जात नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासह परिसरातील नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मालेगाव सारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे करता स्वतंत्र ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन होईल अशा पद्धतीने राहण्याची सोय करुन देण्यात यावी व सेवा बजावत असताना त्यांना शक्य तितक्या प्रमाणात निर्जंतुकीकरण उपकरणे, फेस कवर, हॅन्ड ग्लोज, सैनी टायझर तसेच हॉटस्पॉट मधील अतिसंवेदनशील परिसरात सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पी.पी. ई. कीट सुविधा यासह अन्य आरोग्य सुविधा पुरवणेकामी उचित कार्यवाही करण्याची विनंती खा.डॉ.भारती पवार यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे .






