sawada

बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी आमदार चंद्रकांत पाटील कडे निवेदन द्वारे केली मांगणी

बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी

आमदार चंद्रकांत पाटील कडे निवेदन द्वारे केली मांगणी

अॅगलो उर्दू हाय सावदा येथील प्रकार

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सविस्तर वृत्त असे कि जवळपास दिड महिना पुर्वी लाक डाउन चा गैर फायदा उचलुन अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेतुन विद्यार्थी हक्काचे 12 ते 15 क्विंटल तांदूळ विक्री केल्या ची घटना घडली.सदरील गंभीर प्रकरणा बाबत गावातील तरूण शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी वेळोवेळी खाल पासून ते वर पर्यंत तक्रार केल्या वर ही गेंडया ची कातडी असलेले व कुंभकर्णीय झोपेत लिप्त संबंधितांकडून दिड महिना उलटून ही दखल न घेतल्याने या उलट तक्रार दाराने अर्ज फाटे केल्या ची माहिती शाळा संबंधितांना लागताच याचा धचका घेऊन त्यांनी बाहेरून तांदूळाची जुळवाजुळवी केली. सदरील गंभीर तांदूळ विक्री गैर प्रकणा कडे लक्ष वेधन्या करीता व दोषींवर कठोर कारवाई व्हावी म्हणून पुरावे निशी जितेंद्र पाटील सभापती प.स.रावेर यांची सभक्ष भेट घेऊन तक्रार केली असता त्यांनी लगेच दखल घेतली व 40 दिवसा नंतर प्रशासन कामाला लागले. अधिकृत रित्या सदरील तांदूळ विक्री प्रकणाची पुर्ण माहिती असल्यावर ही साधी दखल न घेणाय्रा रावेर येथील शा पो आ अधिक्षक सह शाळा संबंधितां विषयी दि 05/05/2020 रोजी पुन्हा सभापती व गटविकास अधिकारी प.स.रावेर यांना लेखी अर्ज दिले. दि 07/05/2020 रोजी सदरील अधिक्षक व त्यांचे दोन सहकारी यांनी शाळेत येऊन त्यांना हवी असलेली चौकशी चे सोंग केले. या नंतर दुसरे दिवशी तक्रार दार यांचे सहकारी शेख निसार शेख नबी यांना ठिक 10.15 वाजता सकाळी दूरध्वनी करून तुझा जबाब
नोंदवायचा राहून गेलेला आहे
मला अहवाल लवकर पाठवायचा आहे सावदा बस स्टॉप जवळ पोलिस चौकी ठिकाणी ये तुझा जबाब नोंदवून घेऊ असे सांगणे शा पो आ अधिक्षक यांचा बेजबाबदार पणा उघडकीस येतो.

परिणामी या बाबत च्या सर्व प्रकणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होउन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मांगणी चे निवेदन देण्या कामी आमदार चंद्रकांत पाटील कडे गेले असता ते कामा निमित्त बाहेर गेले आहे. फोन द्वारे त्यांच्या शी संपर्क करून माहिती दिल्या वर त्यांनी पी ए प्रवीण चौधरी व संतोष कोळी यांना निवेदन स्विकारण्यास आमचे कडे पाठविले त्यांनानिवेदन देते वेळी तक्रार दार शेख फरीद शेख नुरोद्दिन सोबत युसूफ शाह , शेख कामिल मेम्बर व शेख निसार शेख नबी होते. दि. 12 मे रोजी पुन्हा फोन द्वारे संपर्क केला असता वरिष्ठ पातळीवर चौकशी व कार्रवाई करणे बाबत जिल्ह्याचे संबंधित अधिकारी यांनासुचना देण्यात आली आहे अशे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

*कौतुकास्पद व खेद जनक*

ज्या संबंधित अधिकाय्रांनी या घडलेल्या तांदूळ विक्री गैर प्रकरणावर जवळपास चाळीस दिवस माती लोटली व चौकशी करणे कामी त्याच अधिकाय्राला पाठवले गेले.हा सर्व प्रकार खेद जनक आहे. चाळीस दिवस चौकशी न करण्या मागचे कारण तांदूळ विक्री करणारे संबंधितांना वाचवण्या सारखे नाही का?

जर वेळेवर संबंधित अधिकारी कडुन यागंभीर तांदूळ विक्री गैर प्रकणाची दखल घेतली गेली असती तर चोरांना पाऊल खुणा नष्ट करण्याची संधी प्राप्त न होता थेट त्यांचे पितळ उघडे पडले असते. परंतु तसे झाले नाही. चुकीचे व अवैध कार्य थांबवण्याकरीता शिक्षण विभाग व शालेय पोषण आहार अधिक्षक रावेर यांना वगळले तर शासनाचे विविध विभागातील अधिकाय्रांनी या लाक डाउन काळात आपली संवेदनशीलता व कर्तव्य दक्षता दाखवून थेट घटना स्थळी जाऊन मोठ्या प्रमाणात अवैध कार्य करणाय्रांवर कायदेशीर कठोर कारवाई केल्या बाबत चे अनेक प्रकरण झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button