विधानसभा उपाध्यक्ष मा.नामदार श्री.झिरवळ सा.यांचे हस्ते खोरीपाडा गावातुन शेतकर्यांना बांधावर खते बियाणे देण्याची सुरवात..
तसेच शेतकऱ्यांना सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन
सुनील घुमरे
नाशिक
कृषी विभागामार्फत करोणा विषाणुच्या पार्श्वभुमीवर कृषि निविष्ठा विक्री केंद्रात होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकर्यांना कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करणेसाठी दिंडोरीतील डिलर्स बंधुना अवाहन करण्यात आले होते. सदर अवाहनास प्रतिसाद देत मे.बोरा कृषी सेवा केंद्र , वणी चे संचालक श्री.महेंद्रशेठ बोरा यांनी खोरीपाडा परिसरातिल शेतकर्यांना आज दि. 9/5/2020 रोजी 5 ton खते मा.नामदार श्री.नरहरी झिरवाळ सा.यांचे हस्ते वाटप केले.
…. तसेच यावेळी शेतकर्यांना सोयाबीनचे घरचे बियाणेची उगवण क्षमता कशी तपासायची याबाबत प्रात्यक्षिक तसेच सोयाबीन बियाण्याची गावाची गरज गावातच भागविणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
…. मा.नामदार महोदयांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले असुन अनावश्यक गर्दी टाळुन बांधावर कृषी निविष्ठा घेण्याचे तसेच सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरायचे आवाहन राज्यातिल शेतकर्यांना केले आहे , तसेच करोणा विषाणु संदर्भात नागरीकांनी सामाजीक भान राखुन अनावश्यक घराबाहेर न पडता शासनास सहकार्य करावे तसेच Social Distancing व Mask चा वापर जरूर करावा असे मत व्यक्त केले.
…… कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी देखील या परिस्थितीत शेतकर्यांना बांधावर रास्त दरात बियाणे व खते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले
सदर वेळी खोरीपाड्यातील श्री. सम्राट राऊत , हस्तेदुमालातील श्री.देवराम राऊत , अहिवंतवाडीचे श्री.जयराम गावित,चौसाळे चे श्री.दत्तु पाटिल आदी शेतकरी तसेच वणीतील कृषी सेवा केंद्र चालक,कृषी सहाय्यक श्रीमती भदाणे ,श्री.संदीप बोर्वे, कृषी पर्यवेक्षक श्री.संजय सावंत, कृषी अधिकारी प.स. श्री.डी.सी.साबळे व तालुका कृषी अधिकारी श्री.अभिजीत जमधडे आदी उपस्थित होत






