Maharashtra

तांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी साठी मिळाले मुहूर्त

तांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी साठी मिळाले मुहूर्त

रावेर शा पो आ अधिक्षक यांना चाळिस दिवसा नंतर आली जाग

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सविस्तर वृत्त असे कि
जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्या मध्ये सावदा अॅगलो उर्दू हाय या शाळेतुन बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी करणे कामी दि 07/05/2020 गुरुवार रोजी शा पो आ अधिक्षक अजित तडवी यांना चाळिस दिवसा नंतर जाग आल्याने त्यांनी चौकशी चे मुहूर्त केले.त्या वेळी त्यांच्या सोबत दोन केंद्र प्रमुख होते. व त्यांनी शाळेत येऊन अनेक दिवसा पासून सदरील गंभीर प्रकरण अधिकृत पणे माहिती असल्याले तांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी चे सोंग दाखवून लिपा पोती केल्या सारखेच वाटत आहे.
वेळ काढु पणा करून या दखल पात्र गैर प्रकरणाची गंभीरता नष्ट करण्याचे हेतू परतसर जोखीम संबंधित प्रशासना कडुन का केले गेले.सदरील तांदूळ विक्री गैर प्रकरणा बाबत शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी दि. 30/03/2020 पासून ते आज पावेतो सतत तक्रारी केल्या असुन ही संबंधित अधिकारी कडुन साधी दखल सुध्दा न घेण्या माघ चे कारण खेद जनक आहे. न्याय देण्यास जर हे प्रशासन जाणिव पुर्वक पणे उशीर लावत असेल तर
चोरांना पाऊल खुणा नष्ट करण्यासाठी मदत केल्या सारखे वाटत आहे. परिणामी

चोराला सोडून सन्याशाला फाशी

चुकीचे व अवैध कार्य करणाय्रांची भरमार असली तरी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे अल्प प्रमाणात असले तरी जनहिता करीता घडलेल्या गुन्ह्यची उकल व्हावी महणुन हक्काची आवाज बुलंद करण्यात ते मागे पुढे पाहत नाहीत. काही असले तरी ते शेवट पर्यंत लढा देण्यास सक्षम असतात. हे विसरता कामा नये.
सदरील तांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी अंतर्गत प्रथम तक्रार दार यांचे वर ताशेरे व प्रश्नांची बौछार करणे समजण्या पलीकडचीबाब आहे.

सदरील चौकशी वेळी अधिक्षक साहेब कडून विचारलेल्या काही प्रश्नां वर तक्रार दार यांनीच प्रश्न उपस्थित केल्या चे तक्रार दार यांनी म्हटले आहे.

अपुरी चौकशी

चौकशी अधिकारी अजित तडवी यांनी तक्रार दार यांचे सहकारी शेख निसार शेख नबी यांची चौकशी वेळी जबाब न घेता आज दि. 08/05/2020 शुक्रवार रोजी सकाळी ठीक 10.15 वाजता दूरध्वनी वरुन संपर्क केले व तुम्ही सावदा बस स्टॉप वर पोलिस चौकी जवळ या तुमचा जबाब नोंदवायचा राहून गेलेला आहे. असे फोन वर बोलले.
सदरील प्रकार बेजबाबदारीचे दुसरे बोलके उदाहरण आहे.

*ठोस प्रहार* नेच या गैर प्रकरणाला सतत आपल्या वृत्तपत्रात जागा दिलेलीआहे.

खेद जनक

जर सदरील गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वेळ काढु पणा न करता वेळे वर चौकशी केली गेली असती तर विक्री केलेले तांदूळ , त्या नंतर उपलब्ध करून अल्प प्रमाणात वाटप केलेले तांदूळ इत्यादी बाबींचा उलगडा झाला असता. व खरोखर या गंभीर प्रकरणा शी संबंधितांचे पितळ उघडे पडले असते.

परिणामी या गंभीर प्रकरणाची दि 5/5/2020 रोजी रावेर प.समिती चे सभापती यांचे समक्ष भेटून घेऊन पुरावे दाखवून तक्रार दार यांनी दिलेल्या तक्रार ची ताबडतोड दखल घेतल्यानेच संबंधित विभाग कामाला लागला.
व निश्चितच सदरील चौकशी निपक्षपाती पणे करून दोषींवर कारवाई होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा जोर धरत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button