मोठा वाघोदा दत्त फर्टिलायझर देतयं पायी वाटसरूंना आधार
प्रतिनिधी/ मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर
कोरोना या महाभयंकर रोगाने घातलेला थैमान व व सरकारनं केलेली टाळेबंदी यामुळे आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी कारखाने विविध कंपन्या मध्ये हातमजुरी करणार्या मजूर वर्गावर उद्योग कारखाने बंद असल्याने उपासमारीची वेळ आली असल्याने आता या मजुरवर्ग आपला घरचा रस्ता पायदळी च गिरवीत निघाला आहे .
मजुरांचे मोठा वाघोदा येथील आधारदूत दत्त फर्टीलायझर
सध्या कोरोना चा प्रादुर्भाव त्यात आपआपल्या.घरी जाणारे पायी मजूरवर्ग सर्वदुर रस्त्यावरुन पायदळ जाताना दिसत आहे. पोटात अन्न.नाही तरीही घराची ओढ अशा निराधार पायी चालणाऱ्या मजुरांना श्री.विशालभाऊ पाटील संचलित दत्त फर्टीलायझर वाघोदा यांच्यातर्फे दररोज अन्नदान केले जात आहे.चक्रधर कंट्रक्शन मार्फत हे अन्नदान केले जात असून दत्त फर्टीलाझरचे कर्मचारी युवराज पाटील,भागवत पाटील,ईश्वर काकडे तसेच संदिप गोकुल महाजन हे सेवा देत आहेत.तसेच गावाकडे पायी निघालेल्या मजुरांना वाहनाद्वारे घरी पोहचवण्याचा विळा उचलेले आधारदूत व आरोग्यदूत निळकंठ(निळूभाऊ) भागवत चौधरी करत आहेत या कार्यासाठी त्यांना प्रगतशील शेतकरी किशोर भाऊ पाटील यांचे सहकार्य लाभत आहेत.
या निस्वार्थ लोकसेवकांनी हे कौतुकास्पद कार्य कोणताही गाजावाजा न करता करत आहेत त्याबद्दल या पायपीट करून पोटात दोन घास अन्न टाकणार्या दात्यांना अन्न दाता सुखी भव चे आशिर्वाद ही मिळत आहे






