Maharashtra

देवळा तालुक्यातील माळवाडी येथील धवळवाडी वस्ती जवळील रस्त्यावर सापडल्या नोटा

देवळा तालुक्यातील माळवाडी येथील धवळवाडी वस्ती जवळील रस्त्यावर सापडल्या नोटा

महेश शिरोरे

देवळा तालुक्यातील माळवाडी येथील धवळखडी वस्तीजवळील रस्त्यावर शंभर, दोनशेच्या एकूण पंधराशे रुपये किमतीच्या चलनी नोटा आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये शंकेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी सायंकाळी शेतीचे काम आटोपून घराकडे येत असलेल्या शेतकरी व मेंढपाळांच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने परिसरातील नागरिकांनी नोटा पाहण्यासाठी गर्दी केली होती. आजूबाजूला शेतात काम करत असलेल्या व्यक्तींना विचारणा केली असता नोटा नेमकी आल्या कुठून हे कुणालाच सांगता आले नाही.

५० ते ६० फूटपर्यंत पसरलेल्या अवस्थेत नोटा आढळून आल्याने वेगवेगळ्या शंका निर्माण होऊन ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पोलीस पाटील सुनील वाघ यांनी देवळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. देवळा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राठोड व तलाठी पुरकर घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. नोटांना हात लावण्यासाठी कुणीही धजावत नसल्याने पोलिसांनी सॅनिटायझर, हॅन्डग्लोझ व चिमटा यांच्या साहाय्याने त्या नोटा ताब्यात घेतल्या. कोरोना विषाणूची दहशत सर्वत्र पसरली असल्याने जाणीव पूर्वक नोटा टाकण्याचे काम कोणी अज्ञात व्यक्तीने केले असावे अशी चर्चा सुरू आहे.

याबाबत देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता खिशातून मोबाईल वगरे काढतांना कुणाच्यातरी खिशातून या नोटा पडल्या असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये असे आवाहन त्याने केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button