३८ दिवसांपासून ‘वसुंधरा’ ची अन्नसेवा
१० हजार फूड पॉकेट, १५७ गरजूंना राशन किट वाटप
लातूर प्रतिनिधी : प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा:-लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसापासून अर्थात गेल्या ३८ दिवसांपासून वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातूर शहरात अन्नसेवा सुरू आहे. या कालावधीत सुमारे १० हजार फूड पॉकेट आणि १५७ गरजू कुटुंबाना महिनाभर पुरेल इतके राशन देण्यात आले. याशिवाय, सामाजिक बांधिलकी जपत मास्क आणि सॅनिटायझरचेही वाटप करण्यात आले.
कोरोना महामारी आजाराने देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना कोणीही उपाशी झोपू नये हा संकल्प घेऊन वसुंधरा प्रतिष्ठान टीम कार्यरत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून अन्नसेवा सुरू आहे. लॉकडाऊन-१ आणि २ काळात शक्य होईल तितक्या गरजवंत लोकांपर्यंत पोहोचून फूड पॉकेट वितरण करण्यात येत आहे. शिवाय, आतापर्यंत सुमारे १५७ गरजू कुटुंबाना राशन किट उपलब्ध करून देण्यात आले. राशन किट मध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल पुडे, शेंगदाणे, साखर, चहापत्ती, पोहे, मीठ, मिरची, हळद आदी जीवनाश्यक वस्तूंचा समावेश आहे. महिनाभर पुरेल इतके राशन यात देण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी अमित बियाणी, ओमप्रकाश बियाणी, कोमल रांदड, श्रीराम साने, विलास महिंद्रकर, अनिकेत मुंदडा, मनोज कुलकर्णी, महेश पाटील, कविता कुसुमकर, सुचिता कुसुमकर, मीनाक्षी महिंद्रकर, योगानंद जोशी, सुरेखा महिंद्रकर, श्रीपाद गावसकर, सुनीता महिंद्रकर, राजा डोईफोडे, ज्ञानेश्वर कास्ते, देवेंद्र तांदळे, युवराज ढगे, अशोक महिंद्रकर, शांता ढगे, एकलव्य संस्थेचे गोपाळ मोदानी, सेवालयाचे रवी बापटले, डॉ.शैलेश पडगीलवार यांचे सहकार्य लाभले. अन्नसेवेचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, रामेश्वर बावळे, अमोल स्वामी, प्रशांत स्वामी, अजित चिखलीकर, श्रीकांत खंडेलवाल, अभिजित स्वामी, संतोष पांचाळ आदींसह वसुंधरा टीम गत ३८ दिवसांपासून परिश्रम घेत आहे.
*मास्क, सॅनिटायझर वाटप*
वसुंधरा प्रतिष्ठानने कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर ३०० मास्क आणि १०० हुन जास्त सॅनिटायझर बॉटल्स वाटप केल्या आहेत. पोलीस, सफाई कामगार, पत्रकार आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना सुरक्षेसाठी मास्क, हॅन्ड ग्लोज आणि सॅनिटायझर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपल्याची माहिती प्रा.योगेश शर्मा यांनी दिली.






