sawada

विद्यार्थ्यांच्या तांदूळावर शाळा संबंधितांनी मारला डल्ला चौकशी व कारवाई साठी थेट मुख्यमंत्री कडे दाद

विद्यार्थ्यांच्या तांदूळावर शाळा संबंधितांनी मारला डल्ला
चौकशी व कारवाई साठी थेट मुख्यमंत्री कडे दाद

सावदा प्रतिनिधी युसूफ

सविस्तर वृत्त असे कि जवळपास तीस दिवसा पुर्वी विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने आलेले शालेय पोषण आहार योजने चे तांदूळ अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेतुन थेट 12 ते 15 क्विंटल तांदूळ विक्री करण्यात आले होते. या बाबत सावदा व परिसरातील गावकय्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती व आहे. सदरील गंभीर व दखल पात्र गैर प्रकारा बद्दल सावदा येथील एका जागृक तरुण शेख फरीद शेख नुरोद्दिन यांनी शालेय पोषण आहार अधिक्षक पं.स.रावेर यांची समक्ष भेट घेऊन तक्रार केली असता त्यांनी लाक डाउन चा विषय पुढे करुन थेट तक्रार स्विकारण्यास मनाई केली.

त्या नंतर या तांदूळ विक्री गैर प्रकणाची तातडीने दखल घेऊन चौकशी व कारवाई होईल या आशेने मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब जि प जळगांव, मा. जिल्हा अधिकारी साहेब जळगांव, मा. संचालक साहेब पुणे, मा.शिक्षण मंत्री साहेब म.रा.मुंबई यांचे कडे तक्रार करून ही आज पावेतो साधी दखल सुध्दा घेतली गेलेली नाही.

सबब न्याय व हक्क मिळणे कामी या लॉक डाउन काळात विद्यार्थी हिता करीता श्रीमान उध्दव जी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे कडे सदरील शाळेतुन विक्री करण्यात आलेले विद्यार्थ्यांचे हक्काचे तांदूळ गैर प्रकणाची चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल व्हवा म्हणुन तक्रार द्वारे दाद मागितलेली आहे. तसेच या गैर प्रकारा बद्दल चे पुरावे चौकशी वेळी सादर करण्याचे तक्रार दार यांनी म्हटले आहे.

खेद जनक……
एका कडे लाक डाउन चा गैर फायदा उचलुन सदरील शाळा संबंधितांनी कायदयाला न जुमानता जाणिव पुर्वक पणे विद्यार्थी हक्काचे 12 ते 15 क्विंटल तांदूळ विक्री केले आणि दुसरी कडे याच लाक डाउन चा विषय पुढे करुन आपली संवेदनशीलता व कर्तव्य दक्षता कडे पाठ फिरवून या गंभीर प्रकरणा बद्दलची तक्रार कडे अधिकाय्रा कडुन लक्ष दिले गेलेले नाही ही बाब समजण्या पलीकडची आहे.

शासना कडून या लाक डाउन काळात सुध्दा थेट घटना स्थळी पथक पाठवून अवैध कार्य करणाय्रांवर तातडीने कठोर कारवाई करून त्यांचे पितळ उघडे करीत आहेत. मात्र अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेतील तांदूळ विक्री गैर प्रकाराला महिना उलटून ही शालेय पोषण आहार विभाग व शिक्षण विभाग चौकशी व कारवाई करणे पासून स्वतः ला अलिप्त ठेवण्या मागचे कारण गुलदस्त्यातच आहे.
तक्रार दार यांनी सदरील तांदूळ विक्री प्रकराणाची चौकशी होई पर्यंत लढा देण्याचे म्हटले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button