कोरोनाच्या विषानुवर मात करण्यासाठी जनतेने स्वयंशिस्त पाळून सामोरे जावे – ना नरहरी झिरवाळ
सुनिल घुमरे
जगभर कोरोनाच्या विषाणू मुळे देशात व राज्यात मोठे थैमान सुरू असून कोरोनाविषाणू सर्व जात, धर्म, गरीब ,श्रीमंत, स्त्री, पुरुष, लहान ,थोर, असा कोणताही भेदभाव न करताआपले काम सुरू आहे व आपण परीक्षा देत आहेत म्हणून नागरिकांनी स्वयंमशिस्त पाळून कोरोनाच्या बाबतीत आरोग्य संघटना, शासनाने सांगितले ले नियम पाळल्यास कोरोनाला हरवू शकतो व हेच मोठे औषध व नंतर उपचार आहेअसे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.
शासन उपाययोजना करण्यासाठी अहोरात्र झटत आहे.शहरी भागात या आजाराचे मोठे रुग्ण असून शहारातील नागरिकानीं याबाबत सोशल डीष्टन्स पाळून घरातच थांबून गरजेपुरते अत्यावश्यक गोष्टी घेण्यासाठी तेही कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाहेर आवश्यकता असेल तर काळजी घेतली पाहिजे.ही साखळी तोडण्यासाठी आपणच आपले रक्षक आहोत म्हणुन सर्वांनी पुढाकार घ्यावा .
ग्रामीण भागात जरी या विषाणूचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असला तरी संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे तो एकमेकांकडून पोहचायला वेळ लागत नाही.त्यामुळे मला काही होणार नाही ,माझ्यापर्यंत येणार नाही असा अविर्भावात न रहाता काही नागरिक वागत असतील तर योग्य नाही.ग्रामीण भागातही याचा प्रसार सुरू अाहे त्यासाठी नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे.ग्रामीण भागातही नागरिकांनी रुमाल, मास्क लावलेच पाहिजे, व हाताला स्वच्छ साबण लावून घुतले पाहिजे व सनेटाईझर चा वापर करावा.
शासनाने लॉकडाऊन च्या काळात गरीब नागरिकांना रेशनकार्ड धारकांना प्रति मानसी ५ किलो तांदूळ मोफत वाटप केले आहे.शासनाच्या रेकॉर्ड प्रमाणे ज्यांचे रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणी झाली आहे त्यांनाच ते तांदूळ मिळाले आहे.पण काही नागरिकांकडे रेशनकार्ड असूनही ऑनलाइन नोंदणी नसल्याने काही गरीब व्यक्तींकडे रेशनकार्ड च नसल्याने त्यांना तांदूळ मिळाले नाही. अशा गरीब नागरिकांना ज्यांना तांदूळ मिळाले आहे त्यांनी आपल्याला मिळालेल्या तांडळातून थोडा वाटा त्या गरीब लोकांना दिल्यास त्यांनाही पोट भरण्यास मदत होईल.हा उपक्रम ढकांबे ग्रामस्थ व रेशन दुकारदार गणपत डोळसे पाटील यांनी राबविला तोच आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यावा असे आवाहन नारहरी झिरवाळ यांनी केले आहे.
राज्य शासन सर्व भागात मदत करण्यासाठी आवाहन करत आहे.त्यास प्रतिसाद देत विविध ठिकाणी विविध संस्था, देणगीदार, आपापल्या पद्धतीने वेगवेगळी मदत करतच आहे.शेतीची कामे सुरू होत आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व नियम पाळत आपले काम सुरू करावे.रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना शेतकऱ्यांच्या शेतात काम करण्याची संधी मिळावी यासाठी यासाठी योजना आखून योग्य निर्णय घेण्याबाबत मा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली असून सकारात्मक निर्णय होईल असे झिरवाळ यांनी सांगितले आहे.यामुळे मजुरांना काम, व शेतकऱ्यांनाही शेतात काम करण्यासाठी मजूर मिळाल्यास शेती करता येईल.
पाणी टंचाईचे संकट
येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचे संकट येऊ नये यासाठी सर्व परिसरात शासकीय अधिकारी यांनी त्याबाबतचे नियोजन करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्याच्या काळात सर्वच नागरिक घरीच व आपल्या गावातच व दिवसभरात पाण्याचा मोठा वापर होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी जनतेला पाण्याच्या बाबतीत टंचाई भासणार नाही याची काळजी त्या भागातील अधिकारी यांनी घेतली पाहिजे. पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शासकीय यंत्रणा यांना सहकार्य करा
कोरोनाच्या पाश्वभूमीवर कोरोनाला हटविण्यासाठी सीमेवर जसे आपले सैनिक बांधव डोळ्यात तेल घालून सज्ज असतात.तसे आज डॉक्टर, नर्स, पोलीस आशा सेविका,पत्रकार, हे सर्व आपल्या कुटुंबातून बाहेर पडत जीवांचे रान करत आहे.तेच खरे देव असून आपल्या कुटुंबातील घटक आहे.त्यांनाही या युद्धातून बाहेर पडण्यासाठी मदत करून नियम पाळले पाहिजे.या सर्वांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे.
राज्यस्तरावर मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ, सर्व विभागाचे सचिव, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व जिल्हाआरोग्यअधिकारी व त्यांची टीम, तालुका स्तरावर प्रांतअधिकारी, तहसीलदार, कार्यकारीअधिकारी, तालुका वैधकीय अधिकारी,कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, यांची संपूर्ण टीम,पोलीस अधीक्षक, विभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस व याअनुषंगाणे काम करणाऱ्या सर्व कर्मचारी वर्ग गाव पातळीवर महत्वाचा घटक म्हणून काम करणारे पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक हे आणि समाजसेवक, व राजकीय पातळीवरील सर्वच आपापल्या पद्धतीने जनतेला मदत करत आहे.आणि जनतेपर्यंत माहिती पोहचवून जनजागृती करण्याचे काम पत्रकार करत आहे या सर्वांचे शासनाच्या वतीने आभार मानून सर्वाना कोरोनाच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचे आवाहन नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.






