रावेर-यावल तालुक्यातील मध्यभागी कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार ; डॉ. अजित थोरबोले
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर
जळगांव जिल्ह्यातील रावेर,व यावल दोन्ही तालुक्यातील सावदा किंवा फैजपूर नगरपरिषद क्षेत्रातील एका ठिकाणी सर्व मिळून एक हजार बेडचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी सावदा येथील बाबू शेठ यांनी या संकटसमयी 300 गाद्या आणि एक हाॅल उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती डॉ. अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांनी जाहीर केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोना या केअर सेंटर सुरू करण्याकरिता समाजातील विविध दानशूर, सामाजिक कार्यकर्ते, संघटना व संस्था यांनी आप आपल्या परिने या लोकाभिमुख कार्यासाठी तत्पर मदत शक्य होईल, त्या स्वरूपात द्यावी, तसेच मदतीचा हात पुढे करून शासनाला मदत करावी, आणि कोरोना युध्दात विजय मिळविण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अनपेक्षित आहे, म्हणून प्रत्येक नागरिकाने कोरोना केअर सेंटर सुरू करण्याकरिता देश व समाज कार्यासाठी मोलाचा वाटा उचलावा. असे जाहीर आव्हान मदतीसाठी डॉ. अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांनी सर्व सामान्य जनतेच्या भल्यासाठी संवेदनशीलता दाखवून केलं आहे.
यासाठी रावेर-यावल सह तालुक्यातील फैजपूर सावदा सामाजिक कार्यकर्ते, संघटना व संस्था ह्या नक्कीच कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी उदार मनाने अनमोल सहकार्य करतील अशी आशा ही अजित थोरबोले प्रांताधिकारी फैजपूर यांनी आपल्या भावनेतून मांडली.
तसेच या कोरोना केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मदतीचा ओघ वाढला तर हे कोरोना केअर सेंटर सुरू होवून यांचा उपयोग जे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले आहेत, त्यांना किमान 14 दिवसांसाठी डॉक्टर यांच्या निगराणित ठेवून त्यावर योग्य ते उपचार सुरू केलें जातील, व अजून यांच्या संपर्कात कोणी येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले यामुळे कोरोना संक्रमण होण्यापासून आळा घातला जाईल अशी साखळी तयार करून कोरोनाविरुद्ध युद्ध जिंकण्यासाठी डॉ. अजित थोरबोले प्रांत अधिकारी फैजपूर यांनी रणनीती आखली आहे याकरिता सर्व जनतेची सहकार्य आर्थिक मदत नितांत गरजेची आहे यासाठी यावल फैजपुर सावदा व रावेर मुख्याधिकारी दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावचे तलाठी यांनी मदतीचे कार्य स्वीकारावे असे आवाहन फैजपूर प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी केले आहे






