Maharashtra

बारामतीप्रमाणेच जामखेडलाही भिलवाडा पॅटर्न राबवावा : प्रा.राम शिंदे

बारामतीप्रमाणेच जामखेडलाही भिलवाडा पॅटर्न राबवावा : प्रा.राम शिंदे

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: बारामतीमध्ये करोनाचा एकच रुग्ण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी भिलवाडा पॅटर्न राबवून बारामतीला करोनामुक्त करण्यात आले. जामखेडमध्येही करोनाची रुग्ण संख्या वाढली असून ही संख्या ११वर गेली आहे. त्यामुळे बारामतीप्रमाणेच जामखेडलाही भिलवाडा पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी नगरचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली आहे.

प्रा. राम शिंदे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून ही मागणी केली आहे. या प्रसिद्धी पत्रकात कुणावरही थेट टीका नसली तरी त्यांचा रोख कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावरच असल्याचे दिसते. पवार कुटुंबीयांनी बारामतीमध्ये जसे लक्ष घातले, तसे जमखेडमध्ये घालावे, असं शिंदे यांना अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्याचंही या निवेदनातून स्पष्ट होते. मात्र, जामखेडमध्ये करोनाबाबत सुरू असलेल्या उपाय योजनांबद्दल शिंदे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू होऊन काल एक महिना पुर्ण झाला आहे. प्रशासनाने केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत ही महामारी नियंत्रणात आणण्यासाठी नगर जिल्ह्यात कसोशीने प्रयत्न केले, रुग्णाची संख्या नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले. पण जामखेड, नगर शहर, संगमनेर, नेवासा इत्यादी ठिकाणी अधिकचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने ती ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केली आहेत. जामखेड वगळता इतर ठिकाणे नियंत्रणात आली. परंतु, काल रात्री जामखेडमध्ये आणखी दोन रुग्णांची वाढ झाली असून जामखेडमधील रुग्णांची एकूण संख्या ११वर गेली आहे झाली आहे. हे ऐकून मला रात्रभर झोप आली नाही. ज्याप्रमाणे बारामतीत एक रुग्ण आढळून आल्यानंतर भिलवाडा पॅटर्न राबवून रूग्णांची संख्या नियंत्रणात आणली. त्याप्रमाणे जामखेडमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची नितांत गरज आहे,अससे राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button