अरोग्य सभापतींच्या भेटीने प्राथमिक आरोग्य केंद्राची पोलखोल ..
भेटीच्या दरम्यान औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठरा कर्मचाऱ्यांपैकी पाच कर्मचारीच हजर
जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा अरोग्य सभापती भारतबाई सोळुंके यांची अरोग्य आढावा घेण्यासाठी अचानक भेट पण अधिकारी व कर्मचारी गैरहजर ..
गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार..
औराद शहाजानी
प्रतिनिधी सलमान पठाण
दिनांक २३
संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या महामारीनै थैमान घातले असताना दिनांक २३ रोजी अचानक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती भारतबाई सोळुंके यांनी दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजता अचानक औराद शहाजानी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता सदरील दवाखान्यात पाच कर्मचारीच हजर होते.दुपारी १२.३० वेळ लंच टाईम ही नव्हता परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यासह बाकीचे तेरा कर्मचारी कुठे गेले आहेत असे विचारणा केली असता कोणीही बोलायला तयार नव्हते सर्वजन हजर आहेत इथेच आहेत असे सांगितले जात होते.
तसेच औराद शहाजानी येथील अरोग्य केद्रातील कर्मचाऱ्यांच्या मनमानी ची वारंवार चर्चा रंगत होती पण आज प्रत्यक्षात अरोग्य सभापती तथा जिल्हा परीषद उपाध्यक्षा यांना पहालाही मिळाली हे गाव असुन तिस हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे विशेषत: येथील अरोग्य केंद्रा महाराष्ट्र व कर्नाटक भागातील म्हणजे कर्नाटक सिमेवर वसलेल्या या गावात आरोग्य सेवेचे बारा वाजाल्याचे चिञ दिसले शासन आरोग्य बाबत अनेक उपाययोजना करत असताना या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर कदम व वैभव कांबळे यांच्यासह तेरा कर्मचारी गैरहजर होते.तर कनिष्ठ सहायक हतागळे एस.जी. आरोग्य साह्ययीका कुलकर्णी एस व्ही.सेविका गाडीवान वाय. व्ही.आरोग्य सहाय्यक पाचंगे बि.जी.सेवक अंतरेड्डी एस.एस.हे कर्मचारी हजर होते.कोरोना संदर्भात काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत सॕनीटायझर मास्क उपलब्ध आहेत का तसेच औषधी साठा आहे का याबाबत आहेत तर किती आहे संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात द्या असे विचारले असता त्यांना देता आली नाही एकुनच या सर्व बाबी तपासणी केली असता उपाध्याक्षा सोळुंके यांनी भेट रजिस्टर वर लेखी स्वरूपात नाराज व्यक्त करत या गैरहजर सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची टिप्पणी केली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चार उपकेंद्र येतात माञ या एकाही उपकेंद्राला वा तेथिल कर्मचाऱ्यांना आशा सेविका यांना सॕनीटायझर मास्क दिले नाहीत असे चौकशीअंती दिसून आले अशी माहिती शाहूराज थेटे यांनी दिली.
शासन कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना औषधी कर्मचाऱ्यांना वापरण्याची साधणे पुरवठा करत आहे माञ वैद्यकीय अधिकारी खालच्या कर्मचाऱ्यांना देत नाहीत याची सखोल चौकशी करणार आहे व तसेच गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कामचुकराई दिसली तर कडक कारवाई करणार असल्याचे उपाध्यक्षा सोळुंके या संपर्क साधला म्हणाल्या जिल्ह्यातील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राला अचानक भेट देणार असल्याचे त्यानी सांगितले.
या त्यांच्या अचानक भेट दौऱ्यात चेअरमन दगडू सोळुंके भाजपा तालुका अध्यक्ष शाहूराज थेटे व राजा पाटील उपस्थित होते.






