सोलापूर च्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री म्हणुन दत्तात्रय भरणे यांची निवड…
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे :सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी इंदापूरचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन बांधकाम वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे.
यापूर्वी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर कोरोना व्हायरस या आजाराच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली होती ,आज सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आली आहे.
कोरोना व सारी या आजाराचे रुग्ण सोलापूर जिल्ह्यात आढळून आले आहेत, दत्तात्रय भरणे यांच्या समोर मोठे आव्हान असणार आहे.






