AmalnerMaharashtra

?अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्ण…उपविभागीय अधिकारी यांची “मेरी मर्जी “आणि गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्ष आणि ढिसाळ प्रशासनाचा परिणाम…

? अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्ण…उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्षाचा परिणाम…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर तालुक्यात मुंगसे या गावी कोरोना बाधित महिला रुग्ण आढळून आली असून सध्या जळगांव येथे औषध उपचार सुरू आहेत.गेल्या 22 मार्च 2020 रोजी संपूर्ण देशासह अमळनेर शहरातही कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करून संचारबंदी सुरू करण्यात आली होती. आता संचारबंदी च्या शेवटच्या टप्प्यात तालुक्यात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला आहे. लोकांच्या,सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून अनेक तक्रारी ,सूचना देऊनही उपविभागीय अधिकारी यांनी मेरी मर्जी म्हणत स्वतःचे निर्णय हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर थोपण्यात आले आहेत.गर्दी असलेले किराणा दुकान निव्वळ व्यक्तीगत रोषामुळे सुरू ठेवन्याचे नगर परिषद कर्मचारी यांना सांगण्यात आले. ही व्यक्तिगत राग काढण्याची वेळ नसून कोरोना शी लढण्याची वेळ आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशी अनेक ठिकाणे होती की जेथे मोठ्या प्रमाणात गर्दी,नियमांचे उल्लंघन, मास्क न लावणे,सोशल डिस्टगसिंग न पाळणे इ प्रकार होत होते आणि आजही होत आहेत. पण स्वतः च उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी या नियमांचे पालन करत नाहीत त्यामुळे सामान्य जनतेने ही केले नाही असेच म्हणावे लागेल.

?अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्ण...उपविभागीय अधिकारी यांची "मेरी मर्जी "आणि गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्ष आणि ढिसाळ प्रशासनाचा परिणाम...

तालुक्यात कोरोना विषाणूजन्य रुग्ण आढळून येण्यास गटविकास अधिकारी देखील तितकेच जबाबदार आहेत. अनेक ग्रामपंचायती गेल्या संपुर्ण महिन्यात बंद आहेत.ग्रामसेवक,ग्रामसेविका,सरपंच अनेक गावांमध्ये उपस्थित नाहीत.उदा हेडावे,कलंबू,भरवस, झाडी,गलवाडे इ ग्रामपंचायत बंद आहेत आणि याची तोंडी तक्रार देखील उपविभागीय अधिकारी यांना करण्यात आली होती. यासंदर्भातील बातम्या देखील ठोस प्रहारने वेळोवेळी प्रसिद्ध केल्या आहेत.उदा हेडावे येथील ग्रामसेविका गाव सोडून जाण्याची परवानगी नसतानाही चोपडा येथे गेल्या होत्या तसेच मी गावात येणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे उत्तर ही दिले होते. या संदर्भात ठोस प्रहार आणि बोलो अमळनेर या दोन्ही न्यूज पोर्टल आणि you tube ला बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या.

?अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्ण...उपविभागीय अधिकारी यांची "मेरी मर्जी "आणि गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्ष आणि ढिसाळ प्रशासनाचा परिणाम...

त्याचप्रमाणे अशी अनेक गावे अशी आहेत की जेथे ग्राम पंचायत आजपर्यंत एकदाही उघडण्यात आली नाही.गावांमध्ये ग्रामसेवक उपस्थित नाहीत.आशा स्वयंसेविका बिचाऱ्या कमी वेतनातही प्रामाणिक पणे काम करताना आढळून आल्या आहेत. गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फवारणी झाल्या नाहीत,बाहेरून आलेले अनेक लोक गुपचूप पणे गावा गावांमध्ये राहत आहेत. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या नाहीत.गावा गावांमध्ये कचऱ्याचे ढीग आहेत,स्वछता नाही.कोरोन्टाईन केलेल्या संशयितांना योग्य सुविधा उपलब्ध नाहीत.घरून जेवण आणा,गादि आणा असे सांगण्यात येत आहे .

सर्व जबाबदाऱ्या पोलीस प्रशासनावर ढकलून मोकळे होता येणार नाही कारण गेल्या काही दिवसांत घडलेल्या 302 च्या घटना आणि अपूर्ण पोलिस बांधवांची संख्या पाहता त्यांच्या वरील कामाचा बोजा वाढला आहे.शहरात लॉक डाऊन यशस्वी होत नाही असे चित्र गेल्या एक महिन्यापासून सातत्याने दिसून येत आहे. याला पूर्ण पणे ढिसाळ प्रशासन जबाबदार असून जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणताही अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही जे बेजबाबदार पणे वागत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही?वेळोवेळी अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लोकानी ,पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्या त्याकडे दुर्लक्ष करून लॉक डाऊन मध्ये “मेरी मर्जी” प्रमाणे प्रशासन चालवून आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट असा भेदभाव ही केला जात आहे. नको त्या लोकांना अत्यावेशक सेवेचे कार्डही देण्यात आले आहेत. त्याचा दुरूपयोग ही केला जात आहे. अश्या अनेक गोष्टी अमळनेर च्या ढिसाळ प्रशासनाच्या समोर आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात कोरोना रुग्ण सापडणे वरील पार्श्वभूमीवर किंवा पार्श्वभूमीमुळे काही विशेष गोष्ट नाही असेच म्हणावे लागेल.

?अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्ण...उपविभागीय अधिकारी यांची "मेरी मर्जी "आणि गटविकास अधिकारी यांच्या दुर्लक्ष आणि ढिसाळ प्रशासनाचा परिणाम...?? आजची परिस्थिती..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button