Maharashtra

गुटखा खाणाऱ्यांचे दात व तंबाखू खाणाऱ्यांचे तोंड झालें कडू दुप्पट ते चौपट पैसा देऊन पुडी मिळेना

गुटखा खाणाऱ्यांचे दात व तंबाखू खाणाऱ्यांचे तोंड झालें कडू दुप्पट ते चौपट पैसा देऊन पुडी मिळेना

रजनीकांत पाटील

अमळनेर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉक डाउन असता त्यामुळे अनेक वस्तूंचा पुरवठा देखील खंडित झाला आहे. उपलब्ध असलेल्या वस्तूंचा साठा व चोरी छुपे केलेला गुटख्याचा साठा तो ही आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दुप्पट ते चौपट दराने विकला जात असल्याने सध्याची तंबाखू व गुटख्याची ची पुडी मिळेना अशी बिकट परिस्थिती नागरिकांवर आली आहे. गुटखा खाणाऱ्यांचे दात सळसळायला लागले असून तंबाखू खाणाऱ्यांचे तोंड देखील कडू व्हायला लागले आहे.
10 रुपयाला मिळणारी तंबाखुची पुडी आता 20 ते 30 रुपये देऊन देखील मिळत नाही व 20 रुपये ला मिळणारी विमल गुटखा 60 रुपये देऊन देखील मिळेना तंबाखु/गुटखा शौकीन त्रस्त झाले आहेत तंबाखू व गुटखा कोणाकडून मागण्याची वेळ आली असता कोणीही देत नाही
रोज ची लागणारी चिमूटभर तंबाखू व गुटख्याची पुडी आता कशी मिळणार चावळीवर गप्पा झोडणारी मंडळी एकमेकांना देखील गुटखा/ तंबाखु देत नसल्याचे दिसत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button