खामखेडा येथे ग्रामपंचायती मार्फत सॅनिटीझर व डेटॉल साबणाचे वाटप
प्रतिनिधी महेश शिरोरे
देवळा तालुक्यातील खामखेडा ग्रामपंचायतने कोरोना विषाणुची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी एक हजार सॅनिटायझर बॉटल व एक हजार डेटॉल साबण प्रत्येक घरासाठी सॅनिटायझरचे व डेटॉल साबणाचे वाटप सरपंच उखड्याबाई पवार ,उपसरपंच संजय मोरे, व सदस्य ,ग्रामसेवक व्ही बी सोळसे यांच्या हस्ते घरोघरी जाऊन वाटप करण्यास सुरुवात केली. फक्त वाटपच नाही तर त्याचा वापर कसा करायचा व काळजी कशी घ्यायची या विषयी माहीती आशा स्वयंसेविका, आरोग्य विभागा मार्फत देण्यात आले असून,तसेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना सुचना देणेत आल्या व घरातुन बाहेर न पडण्या विषयी विनंती करण्यात आली .,आजारांपासून गावातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, या हेतूने वारंवार हात धुण्यासाठी साबण वापरला जावा या उद्देशाने साबणाचे वाटप करून ,हात कसे धुवावे व सॅनिटायझर कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक आरोग्य विभागाचे आरोग्य साह्ययक संजय कुंभारडे यांनी करून दाखविले .दोन दिवसांच्या आत आरोग्य विभागाच्या वतीने संपुर्ण गावात व वस्त्यावर घरोघरी जाऊन सॅनिटायझर व डेटॉल साबण ग्रामपंचायती मार्फत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच संजय मोरे यांनी दिली.
या वाटपासाठी सरपंच उखड्याबाई पवार, उपसरपंच संजय मोरे ,तसेच आण्णा पाटील, बापू शेवाळे, दादाजी बोरसे, सुनील शेवाळे, ग्रामसेवक व्ही बी सोळसे, प्रशांत शेवाळे, हेमंत विसपुते, विजय देवरे, निवृत्ती बिरारी ,मंगेश शेवाळे, आरोग्य सेविका एल जी ठाकरे , आरोग्य सहायक संजय कुंभारडे ,आशा स्वयंसेविका,उपस्थित होते.ग्रामपंचायत लिपिक विजय शिरसाठ, शिपाई दावल पानपाटील व संगणक चालक राहुल जाधव, आशा स्वयंसेविका , आरोग्य सेविका यांना संपूर्ण गावात वाटपासाठी परीश्रम घ्यावे लागणार आहे.






