Maharashtra

गोर गरीब जनतेला तात्काळ अन्नधान्य पुरवा अन्यथा जनतेमधून भुखमारीचा उद्रेक होईल..

गोर गरीब जनतेला तात्काळ अन्नधान्य पुरवा अन्यथा जनतेमधून भुखमारीचा उद्रेक होईल..

प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे

अक्षय धावारे भिम आर्मी महाराष्ट्र संघटक
देशात उद्भवलेल्या कोरोना वायरसमुळे संपूर्ण महाराष्ट्र असह्य झाला आहे यातच लातूर जिल्ह्यात असंख्य नागरिक गोर गरीब रोजंदारीवर कामकराणारे मजूर शेतकरी वर्ग सह अन्न धान्यापासुन वंचित झाले आहे या परिस्थितीत शासनाने 144 कलम लागू करून लॉकडाऊन केले आहे लाखो नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर मात करण्यासाठी उपाययोजना म्हणुन मा. पंतप्रधान व मुख्यमंत्री साहेबांनी जनतेला आव्हानात्मक आव्हान करून गोर गरीब जनतेला सांगितले की लॉकडाऊन च्या कार्यकाळात उपाशि राहू देण्याची वेळ येऊ देणार नाही प्रत्येक व्यक्तीला तिन महिन्यापर्यंत जिवनावश्यक वस्तू अन्नधान्य व गॅस सिलिंडर ची व्यवस्था करण्यात आली आहे असे सुचित करून नागरिकांना जिवनावश्यक वस्तू चा साठा उपलब्ध करून दिला आहे यामुळे नागरीकावर उपासमारीची वेळ येणार नाही असे अश्वासन देऊन ही आजपर्यंत लॉकडाऊन ला 26 ते 27 दिवस उलटून गेल्यानंतर ही लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतिने मा.पंतप्रधान व मा.मुख्यमंञी साहेब यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नसल्यामुळे जिल्ह्यातील जनतेत प्रचंड प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण गेल्या 26/27 दिवसांपासून जनता भयभित होऊन जिवनावश्यक वस्तू अन्नधान्य /अन्य सामग्रीपासुन वंचित असुन कठोर जिवनयातना भोगत आहेत यातच शासनाने कलम 144 लागू करून लॉकडाऊन केले आहे हाताला काम नाही जवळ अर्थसाहाय्य नाही जगण्यासाठी अन्नधान्य ही नाही या परिस्थितीमध्ये कोरोना वायरस पेक्षाही भयानक व भयंकर परिस्थिती लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे या उद्भवलेल्या परिस्थितीत जबाबदार कोण, याच कारणामुळे जणता पोटाची भुख भागवण्याकरिता घराच्या बाहेर निघाल्यास पोलीस प्रशासनाकडून जनावरापेक्षाही अमानुषपणे नागरीकांवर लाठी चार्ज होत आहे अशा परिस्थितीत उग्र रूप धारण केले आहे
तरी मा.ना.मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे साहेबांना भिम आर्मी च्या वतिने नम्रपने विनंती करतो की आपण स्व:ता जिल्हाधिकारी साहेब लातूर यांना आदेशित करून आपण व मा.पंतप्रधान साहेबांनी दिलेल्या आदेश व अश्वासनाची ताबडतोब अंमलबजावणी करण्याच्या आदेशाला आदेशित करून संपुर्ण लातूर जिल्ह्यातील गोर गरीब जनतेला शासन/प्रशासनाच्या वतीने घरपोच तिन महिन्यापर्यंत मोफत अन्न धान्य सामग्री व अर्थसाहाय्य देऊन उपकृत करावे ही नम्र विनंती असे अशयाचे निवेदन या.जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंञ्याकडे केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button