दगड खडी फोडणाऱ्या कामगाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर दगड खाणीत आणि रस्त्यावर दगड फोडून आपला उदर्निवाह करणाऱ्या मजूरांनाही लाॅकडाऊनचा फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दगड खाणी आणि रस्त्याची कामे बंद असल्याने येथील अनेक कागारांची अभाळ सुरु आहे. दररोज कष्टाची कामे कऱणारऱ्या कासेगाव (ता.पंढरपूर) येथील दगड फोड्या मजूरांनाही आज मनसेेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अन्नधान्याचे वाटप करुन माणूसकीचे दर्शन घडवले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा लाॅकडाऊन वाढवला आहे त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या मजूरांना मोठा फटका बसला आहे. छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मजूरांनाही त्याची मोठी झळ सोसावी लागत आहे.कासेगाव (ता.पंढरपूर) परिसरात अनेक दगड खाणी आहेत. येथील खाणीत दगड फोडून आपला उदर्निवाह करणार्या मजूरांची संख्या देखील जास्त. लाॅकडाऊनमुळे येथील मजूरांना काम धंदा नाही. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.दगड फोडून आपली उपजीविका कऱणाऱ्या लोकांना मदतीची गरज होती. त्यांची ही गरज ओळखून मनेसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज कासेगाव येथील सरपंच बाबूशा धोत्रे, तलाठी विजय जाधव आणि ग्रामसेवक सुभाष यलपले यांच्या हस्ते या मजूरांना अन्नधान्याचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी मनसेेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, पोलिस पाटील दौलत जाधव,शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपाध्यक्ष महेश पवार, सहकार सेनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सिध्देश्वर खिलारे,संजय रणदिवे आदी उपस्थित होते






