मोठा वाघोदा येथील स्वस्त धान्य दुकानात सोशल डिस्टंसिंग जपून मोफत धान्य वितरण
मंडळाधिकारी यांचे उपस्थितीत लाभार्थ्यांना धान्य वाटप
प्रतिनिधी/ मोठा वाघोदा.ता.रावेर.मुबारक तडवी
मोठा वाघोदा येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५४ व ५५ या दोन्ही स्वस्त दुकानावर समक्ष जाऊन लाभार्थ्यांना स्वयं उपस्थितीत सोशल डिस्टसिंन चे तंतोतंत पालन करीत अंत्योदय,बीपील व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वाटप केले
मंडळाधिकारी शेलकर सचिन पाटील तलाठी पी.आर.वानखडे ग्रामपंचायत सदस्य मुबारक ( राजू ) तडवी अमिनाबाई तडवी कोतवाल मुशीर तडवी,स्वस्त धान्य दुकानदार अशोक माधव महाजन ,विजय पाटील आदी सह ग्रामस्थ हजर होते मात्र केसरी कार्ड धारक व बिना कार्ड धारक नागरिकांनीही यावेळी धान्य मिळविण्यासाठी तौबा गर्दी केली मात्र संबंधित स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांची समजूत काढत नाकी नऊ आले होते.या शासनाने एकाला टांगेशी आणि दुसर्याला जांगेशी असा दुजाभाव न करता सरसकट धान्य वितरित करणे आवश्यक असल्याचे ही या निरास कोरोना टाळेबंदी पिडीत नागरिकांतून सुर निघाला व प्रशासनाच्या दुजाभाव कार्यपद्धती बद्दलची नाराजी व्यक्त केली






