सायकल वरुन फिरुन कोरोनाचा प्रादुर्भावाबाबत जनजागृती
प्रतिनिधी सुनिल घुमरे
सायकल वरुन फिरुन कोरोनाचा प्रादुर्भावाबाबत जनजागृती
कोरोना व्हायरस मुळे संसर्गाचा लहान मोठ्यांना मोठा धोका वाढल्याने आपल्या शहरात या बाबत जनजागृती व्हावी या साठी वणी शहरातील एका युवकाने वेगळीच शक्कल लढवली कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी एक मालवाहतूक सायकलवर कोरोना चा पुतळा लावत घरा बाहेर पडु नका शासनाचे नियम पाळा असे फलक लावुन संपुर्ण गावात फिरत जनजागृती सुरू आहे.
वणी शहरातील भरत गांगुर्डे नावाच्या युवकाने आपल्या सायकलवर एक पुतळा बनवून त्याच्या हातात कोरोनाची सांकेतिक प्रतिकृती तयार केली व ती त्या पुतळ्याच्या हातात देण्यात आले आहे ‘गर्दी करु नका बाहेर पडु नका ‘ असे साध्या पुठ्ठ्यावर फलक बनवून सायकल ला लावलेले आहेत त्यावर गर्दी करू नका, घरात रहा,कामा शिवाय बाहेर पडू नका शासनाचे नियम पाळा व सहकार्य करा अशा आशयाचे फलक लावलेले असुन जनजागृती चे काम वणी शहरात भरत यांच्या कडुन करण्यात येत आहे भरत हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहे याच मालवाहतूक सायकलवर तो हमालीचे काम करतो.
सध्या सर्वत्र बंद असल्याने कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव आपल्या परिसरात होवु नये यासाठी जनजागृती करत आहे हाताला काही काम नाही तरी अश्या परिस्थितीत जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरस पासुन आपल्याला वाचवा गर्दी करू नका विनाकारण बाहेर पडू नका प्रत्येकाने ठराविक अंतर पाळा असा संदेश घेवुन भरत गांगुर्डे नावाच्या आवलियाचे काम सुरू आहे सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येते आहे
फोटो- वणीतील भरत गांगुर्डे नावाच्या युवकाने आपल्या सायकलवर कोरोना चा पुतळा लावत घरा बाहेर पडु नका शासनाचे नियम पाळा असे फलक लावुन जनजागृती करतांना
छाया-अनिल गांगुर्डे वणी






