बिलोली तालुक्यात लाॕकडाऊनचा उडाला फज्जा
तेलंगणातुन महाराष्ट्राच्या सिमेलगतच्या गावात शिंदीची सरास विक्री
नांदेड प्रतिनिधी वैभव घाटे
दि.24 मार्च 2020 पासुन संपूर्ण देशाभरात लाॕकडाऊन घोषित केल्यापासुन संपुर्ण भारतात लाॕकडाऊनचे पालन होत आसताना महाराष्ट्र च्या सिमेलगतच्या गावामध्ये शिंदीची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोणाचा कहर संपुर्ण जगभरात सुरु आसताना महाराष्ट्रच्या सिमेलगतQ मात्र तेंलगणातील शिंदी मांजराQqQ नदीQ पाञातुन सरासपणे शिंदीचाQ पुरवठा होत आहे .महाराष्ट्रच्याq सिमेलगत आसणार्या गावात शिंदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे . तेंलगणातील निझामबाद जिल्हात आणी महाराष्ट्रच्या सिमेवर आसणार्या बोधन तालुक्यात कोरोणा ग्रस्त रुग्ण आसल्याचे आढळुन आल्याने या लोकांचा संसर्ग महाराष्ट्राच्या सिमेलगत आसणा-या गावातील लोकांना होण्याची मोठी शक्यता आहे . त्यामुळे सिमेलगत आसणा-या महाराष्ट्रातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . मांजरानदीतुन आडवाटेने डोक्यावरून शिंदीची वाहातुक केली जात आहे . तसेच तेंलगणा राज्यातुन लोकांची जा ये मोठ्या प्रमाणात सुरुच आहे .याकडे महाराष्ट्रच्या पोलीस प्रशासनाचे ही दुर्लक्ष होत आहे पोलीस प्रशासन जर गांभीर्याने लक्ष या बाबीकडे नाही दिल्यास कोरोणाच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात सिमेलगतच्या भागातील लोकांना होवु शकतो. कोरोणाचा कहर शेजारच्या तेंलगणा राज्यात मोठ्या वेगाने वाठत आहे . त्यामुळे सिमावर्ती भागातील लोंकानी घरात राहुन काळजी घेत आहेत .परंतु काही मुठभर लोकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे किती तरी लोकांना यांची किंमत मोजावी लागेल यांची ही भिती लोकांमध्ये आहे . पोलीस प्रशासनाकडुन दिवसभरात किमान दोन वेळेस पोलीस प्रशासनाने गस्त घातली जावी अशी मागणी गंजगाव चे सरपंच सौ. साविञाबाई घाटे यांनी केली आहे .






