Maharashtra

विरोधकांची पर्वा न करता सत्याच्या बाजुने उभे राहने पत्रकाराचे कर्तव्य -संपादक निसार मुजावर

विरोधकांची पर्वा न करता सत्याच्या बाजुने उभे राहने पत्रकाराचे कर्तव्य संपादक निसार मुजावर

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

कोरोणा विषाणू चा प्रसार रोखठ्यासाठी मा.नरेंद्र मोदी नी २१ दिवसाचे लॉक डाऊन केल्यामुळे व संचारबंदी असल्यामुळे लाखो दिलाची धडकन सा. पुज्य नगरीचे संपादक निसार मुजावर यांनी आपला वाढदिवस घरीच साजरा करण्याचे ठरवले असल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झालेचे चित्र दिसत आहेत.

पत्रकार क्षेत्रातील विविध अडचणीवर मात करीत पत्रकार ते संपादक असा खडतर प्रवास करीत गेल्या २० वर्षा पासुन पत्रकारीता क्षेत्रात सक्रीय असलेले परंडा येथिल सा . पुज्य नगरी चे संपादक निसार मुजावर यांच्या कार्या मुळे शेकडो मित्र परिवार जोडला गेला असुन मित्रपरिवार ,हितचिंतक यांच्या कडून दि १० रोजी त्यांच्या वाढदिवसा निमीत्त सोशल मिडीया वरून व्हॉटअॅप, फेसबुक इंस्ट्रागम आदी वरून शुभेच्छाचा वर्षाव केला गेला .

पुज्यनगरीचे संपादक निसार मुजावर हे एक गरीब कुटुंबातील आहेत. ते एक निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत ते निर्भीड पत्रकाराच काम करत आहेत. एखादयावर अन्याय होता कामा नये असे त्यांना मनापासुन वाटत असते. काही कारणास्तव एखायावर जर अन्यायच झाला असेल तर ते अगोदर विषयाच्या मुळापर्यत जातात व मग समोर कोणोही असो अन्यायाला वाच्या फोडण्याचे काम करतात. निसार मुजावर हे पत्रकारितेच्या माध्यमातुन एक प्रकारचे समाजसेवकच बनले आहेत. कोणावर अन्याय होत असेल तर लोक त्यांच्याशी संपर्क साधतात.

मुजावर हे दररोज नवीन विषयावर बातमी लिहून समाजात जन जागृती करण्याचे काम करतात, ते गेली २० वर्ष निर्भीड बातम्या देण्याच काम करत आहेत मग आर्थिक अडचणीवर मात देऊन समाजासाठी ते दिवसरत्र झटत आहेत.

पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना पत्रकारांनी पत्रकारीता हाच आपला धर्म मानला पाहिजे तरच तळागाळातील जनतेचा दबलेला अवाज शासन , प्रशासना पर्यंत पोहचेल व त्यांना न्याय मिळेल .

तसेच पत्रकारांनी नेहमी सत्याच्या बाजुने उभे रहायला पाहिजे या साठी काहींचा विरोध पत्करावा लागला तरी चालेल मात्र पत्रकारीता धर्म निभावने गरजेचे असल्याचे मत त्यांनी अनेक वेळा बोलुन दाखवले होते .

शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी नेहमी लढत असल्याने अनेक हितचिंतक निर्माण झाले तर काही विरोधक देखील निर्माण झाले मात्र त्यांनी त्यांची कधीच पर्वा न करता जन हिताची पत्रकारीता सुरू ठेवली , व अनेकांना न्याय मिळऊन देण्याच पुण्याच काम त्यांनी केल आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button