Mumbai

लॉक डाऊन च्या काळात गाडी वाहनाला परवानगी दिली म्हणून  भापोसे, प्रधान सचिव यांना सक्तीची रजा… गृहमंत्रालया चे आदेश

लॉक डाऊन च्या काळात गाडी वाहनाला परवानगी दिली म्हणून भापोसे, प्रधान सचिव यांना सक्तीची रजा… गृहमंत्रालया चे आदेश

मुंबई पी व्ही आनंद

कोरोना या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, संपुर्ण भारतामध्ये
दि.१४.०४.२०२० रोजी पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला असतानाही, श्री.अमिताभ
गुप्ता, भापोसे, प्रधान सचिव (विशेष) यांनी त्यांच्या लेटरहेडवर स्वत:च्या स्वाक्षरीने
श्री.कपिल वाधवान व इतरांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी शिफारस
पत्र दिले असून, त्यामध्ये त्यांना वाहनांसह प्रवास करण्यास आवश्यक सहकार्य करण्याचे
नमूद केले आहे. यासंदर्भात खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे :अ) सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्री.मनोज सौनिक, भाप्रसे, अपर मुख्य
सचिव, (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
आ) श्री.मनोज सौनिक, भाप्रसे यांनी आदेशाच्या दिनांकापासून पंधरा दिवसांमध्ये
चौकशी करुन, चौकशी अहवाल सादर करावा.
इ) श्री.अमिताभ गुप्ता, भापोसे यांना पुढील आदेशापर्यंत तातडीने सक्तीच्या रजेवर
पाठविण्यात येत आहे.

ई) प्रधान सचिव (विशेष) या पदाचा कार्यभार श्री.श्री कांत सिंह, भाप्रसे, अपर मुख्य
सचिव (अपिल व सुरक्षा), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे पुढील आदेशापर्यंत
अतिरिक्त स्वरुपात सोपविण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button