Maharashtra

उमरेडच्या तरुणीने स्वनिर्मित 100 मास्कचे झोपडपट्टीत घरोघरी जाऊन

उमरेडच्या तरुणीने स्वनिर्मित 100 मास्कचे झोपडपट्टीत घरोघरी जाऊन वितरण केले व सोबतच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केली घरोघरी जनजागृती उमरेड नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवीका प्रियंका लोहबरे यांच्या पुढाकार

प्रतिनिधी अनिल पवार

चांपा देशभरात कोरोणामुळे दहशत पसरलेली आहे. जिल्ह्यात संचारबंदी लागलेली आहे. आंतर जिल्हा व आंतर राज्याच्या सीमा असेल सील करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन धडपडत आहे.मास्कचा अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीत नागरिक, प्रशासनातील कर्मचारी, सफाई कामगारांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवीका प्रियंका सूर्यभान लोहबरे रा .उमरेड या तरुणीने पुढाकार घेतलेला आहे.

स्वताच घरबसल्या साध्या कपड्यांचे मास्क तयार केले . लाकडाऊन स्थितीतही उमरेड शहरातील रेल्वे स्टेशनच्या झोपडपट्टीतील गोरगरीब व गरजूना घरोघरी जाऊन मास्क वाटप करतेवेळी कोरोना संसर्गापासून आपला बचाव करण्यास वेळोवेळी हात स्वच्छ धुणे , व नियमित बाहेर जातांना मास्कचा वापर करावा अश्या विविध उपाययोजनावर मार्गदर्शन केले . उमरेड शहरात असलेल्या झोपडपट्टीत घरोघरी जाऊन महिला , पुरुष व वयोवृद्ध नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त मास्क वाटप करण्याकरिता स्वतःच मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. त्यांच्या कामाचे उमरेड तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

दिवसरात्र कोरोना विषाणु सोबतच लढाई करीत असलेल्या शासकीय कर्मचारी अहोरात्र आपल्या कार्यात गुंतलेले असून , गोरगरीब जनतेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सर्व सफाई कामगारांना व इतर कार्यालयातील कर्मचारी यांना मास्क देण्यासाठी स्वताच स्वखर्चाने साध्या कपड्यांचा मागील पाच दिवसापासून मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेले आहेत. कुठल्याही प्रशिक्षणा शिवाय नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवीका प्रियांका लोहबरे यांनी मास्क बनविण्याचे कौशल्य प्राप्त केले.

नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवीका प्रियांका लोहबरे यांनी नुकतेच शंभर मास्क अतिशय कठीण परिस्थितीत स्वता पुढाकार घेऊन मास्क तयार केले .व गोरगरीब नागरिकांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी उमरेडच्या नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवीका प्रियांका लोहबरे यांनी घेतलेला पुढाकार हा निश्चितच कौतुकास्पद आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button