Maharashtra

लॉकडाऊन काळात तांबरवाडी शाळेत शिल्लक पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप

लॉकडाऊन काळात तांबरवाडी शाळेत शिल्लक पोषण आहाराचे धान्य विद्यार्थ्यांना वाटप

औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

ठोस प्रहार वृत्तसेवा:-जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने सगळीकडे रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बऱ्याच दिवसापासून बंद आहेत. आणि पुढेही बंद राहणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून दिले जाणारे अन्न धान्य शिल्लकच राहिले आहे.त्याचे वाटप तांबरवाडी-राजेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमधून विद्यार्थ्यांना करण्यात आले. औसा तालुक्यातील तांबरवाडी-राजेवाडी येथील
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन चे सर्व नियम काटेकरपणे पाळत हे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी तांबरवाडी-राजेवाडी शाळेतील विध्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून किल्लारी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे हे गावात राऊंड साठी आले असता त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पोषण आहार शिल्लक धान्यसाठा वाटप करण्यात आला यात प्रामुख्याने तांदूळ व डाळींचा समावेश होता.

राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना च्या पार्श्वभूमी वर देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे,कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर अत्यावश्यक सेवा सोडून सर्वकाही बंद करण्यात आले असून सर्व शाळा ,महाविद्यालय, प्राथमिक शाळा यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा बंद आहेत, विद्यार्थी शाळेत येत नसल्यामुळे अशा परिस्थितीत शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शालेय पोषण आहारही बंद आहे. त्यामुळे हे शालेय पोषण आहाराचे धान्य शाळेत तसेच पडून आहे. ते विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असल्यामुळे शाळेत पडून असलेले हे चांगले शालेय पोषण आहाराचे धान्य वाटप करण्यात आले. सर्व पालकांना शाळेत येताना मास्क लावून व गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे संचारबंदी चे तंतोतंत पालन करण्यात आले. शालेय पोषण आहारा चे धान्य घेण्यासाठी आलेले सर्व पालकांनी मास्क बांधून व दूर दूर अंतरावर उभे राहून नियमांचे काटेकोर पालन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळा ठरवून देऊन शाळेत गर्दी न करण्याचीही अगोदर सूचना देण्यात आल्या होत्या.

शालेय पोषण आहार वाटपा साठी तलाठी सुरवसे, ग्रामसेवक हाके मॅडम, मुख्याध्यापक राठोड सर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक भोकरे, राजकुमार जाधव, बाळासाहेब पाटील, किशोर उत्तके, संजय बाजुळगे, परमेश्वर माडजे, घोडके सर,जाधव सर,बाजुळगे सर, मुगळे मॅडम, आशा कार्यकर्ते सुनीता बिराजदार(खाडगावे) आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button