अंभी व पाथ्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची भेट
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि. ०७
सध्या जगभरात तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (covid 19) मुळे लाॅकडाऊन मुळे सवाॆंचीच परिस्थीत अंत्यत वाईट झाली असुन शिवसेना उपनेते माजी जलसंधारण मंत्री आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना व्हायरस या खतरनाक महामारीच्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्ष(आरोग्य व शिक्षण सभापती) धनंजय सावंत यांनी स्वतः अंभी व पाथ्रुड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्वतयारीसह आढावा दि. ०७ रोजी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आपण कोणकोणत्या सेवा देतोत, कोरोना व्हायरस कक्षा विषयी उपलब्ध बेड व एकंदर एकूण आढावा, कर्मचाऱ्यांच्या काही समस्या, याविषयी डॉ.अमोल शिनगारे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व कर्मचाऱ्यांना उस्मानाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.






