Maharashtra

लोणंद मधे फिरून शेतमाल, भाजीपाला विकण्याचा निर्णय. लोणंदच्या नागरिकांनी घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

लोणंद मधे फिरून शेतमाल, भाजीपाला विकण्याचा निर्णय.
लोणंदच्या नागरिकांनी घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

प्रतिनिधी दिलिप वाघमारे

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोणंदच्या नागरिकांनी व विक्रेत्यांनी एकमुखाने वेळेचे बंधन घालून तसेच गल्लोगल्ली फिरून फळे व भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या जिल्हात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लोक स्वतःहून बंधने पाळत आहेत. लोणंद येथील फळविक्रेते , भाजीपाला विक्रेते व किराणा दुकानदार यांच्या नगरपंचायत येथे नगराध्यक्ष, नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या संयुक्त बैठकीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लोणंदच्या बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना भाजीपाला व फळे खरेदी साठी सकाळी नऊ ते चार असे वेळचे बंधन घालून तसेच फळे व भाज्या यांना एका ठिकाणी न विक्री करता फिरून विक्री करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले आहे. तर किराणा खरेदी साठी सकाळी नऊ ते दुपारी दोन ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

यावेळी लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात बैठकीसाठी लोणंद मधील फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते व व्यापारी तसेच नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील, उपनगराध्यक्ष किरण पवार, नगरसेविका दिपालीताई क्षीरसागर, स्वातीताई भंडलकर, नगरसेवक राजेंद्र डोईफोडे, योगेश क्षीरसागर, पुरुषोत्तम हिंगमिरे, सुभाष घाडगे, विकास केदारी, दशरथ जाधव, वसंत पेटकर, धनंजय शेंडे , राहुल नागर , जयेश दोशी , प्रशांत गांधी , मोहित शहा, तुषार शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button