शिरूड परिसरात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत बांधकाम कामे सुरू
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
अमळनेर : जगभरात कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले असून शासन दिवस रात्र एक करून उपाय योजना करत आहे.संपूर्ण देश लॉक डाउन करण्यात आला आहे या बाबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हेलपट करत आहे तरी देखील ग्रामीण भागातील बांधकाम कामे सुरूच अमळनेर शहर व तालुक्यातील बांधकाम कामे बंद करण्याचा आदेश तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिला असता. की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत होत असल्याने मात्र शिरूड परिसरात ही बाब कोणीही गांभीर्याने लक्षात न घेता आदेशानचे पालन न करता उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे.
गावातील काहीं चे बांधकाम थांबले असून मात्र काहींनी शासनाच्या नियमांना धाब्यावर बसून बांधकामे सुरू आहे. या वर मात्र आतापर्यंत कोणतीही कारवाही झाली नाही. आदेशाचे पालन करत ज्यांचे काम बंद ठेवले असता त्यांनी आवाज उठवला की गावातील बांधकाम कामे बंद का होत नाही ग्रामपंचायतीने ती लवकरात लवकर करावी.
या बाबत कोणी जो कोणी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत असेल या वर ग्रामपंचायतीने कारवाही करावी.अशी मागणी आहे.






