खाजगी मायक्रो फायनान्स, बॅंक बचत गट हप्ते पूर्णत माफ करणेबाबत. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष साधना ताई राऊत शासनाकडे मागणी करणार
प्रतिनिधी
रफिक आतार
पंढरपूर मधील महिलांकडून आम्ही मागणी करतो की आपणास एक आपली बहीण, आई, वाहिनी, मुलगी, या नात्याने एक कळकळीची विनंती करतोय की, आम्ही आमचा उदर्निवाह चालवा म्हणून खाजगी मायक्रो फाइनास आणि काही बँकेतून छोटया स्वरूपात कर्ज घेतली आहेत.
ती कर्ज आम्ही महिलांनी, वेळोवेळी न चुकता भरलेली आहेत.ज्यावेळी आमचे व्यवसाय चालु होते. त्यामध्ये आमच्या नफा मधून आमच्या गरीब प्रपंच पाहत हप्ते वेळेत भरू शकलो आहे.
सध्या कोरोना मुळे आमचे व्यवसाय बंद पडले आहेत. या कालावधीत आमच्याकडे असणारे पैसे संपले आहेत. आता आमचीच जगायची पंचायत झाली आहे. त्यामुळे तीन महिन्यात आमच्याकडे आमचा कोलमडलेला संसार कसा सावरायचा याचीच चिंता पडली आहे. तर आमच्या दारात येणाऱ्या त्या वसुली वाल्या बचत गट सर ला कुठून पैसे द्याचं. याचीच फार मोठी चिंता आमाला महिलांना पडली आहे.
शेतकरी राजाला पाऊस नाही पडल्या वर दुष्काळ म्हणून आपण जसे कर्ज माफ केले. उद्योग पती कसे धंदे तोट्यात गेल्यावर हात वर करून कर्ज माफ करून घेतात. त्याच पद्धतीने आमच्या महिलांना यातून मोकळे करण्यासाठी सरकार ने पावले उचलावी. अन्यथा दररोज दारात येणाऱ्या त्या सर बरोबर भांडण होण्याची शक्यता आहे.
आपण सरकार म्हणून ही गंभीर बाब आहे. याकडे प्राधान्य देऊन मोठया संकटातून मुक्त करावे ही आम्ही सर्व बचत गटातील महिला मार्फत विनंती करीत आहोत. यामध्ये लक्ष घालावे ही आई, बहिणी, वाहिनी, म्हणून आपल्या पुढे पदर पसरत आहोत. आमी महिला कर्ज बुडवी नाहीत परंतु संकट आल्यामुळे ही विनंती आपणास करीत आहोत. लवकरच ही गोड बातमी घोषणा करावी ही हात जोडून विनंती.
कळावे
आपली आई, बहीण, वाहिनी






