Maharashtra

शिरुड शेतशिवारात शॉट सर्किट संपूर्ण शेताने घेतला पेट कुठलीही जीवित हानी नाही.

शिरुड शेतशिवारात शॉट सर्किट संपूर्ण शेताने घेतला पेट
कुठलीही जीवित हानी नाही.

रजनीकांत पाटील

अमलनरे : तालुक्यातील शिरूड परिसरातील गावालगत असलेल्या छबिलाला राजाराम पाटील यांच्या शेत शिवारात गहू कापनी झाली असून संपूर्ण शेत खाली झाले असता. उर्वरित खाली पडलेल्या गहूची वेचणी(सरा) करत असतांना अचानक झालेल्या शॉट सर्किट मुळे संपूर्ण शेताने पेट घेतली असून शेतात काम करणारे मजूर यांनी पळ काढत जीव वाचवला असता आगीचा पेट वाढत गेल्याने आग शेताच्या.

बांधा पर्यंत पोहचली असता बांधा वरील दोन चाऱ्याचे ढिगारे जळून खाक झाले. सर्व मजुरांनी मिळून विहरींतुन पाणी आणून आग विझवली. कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या बाबत शेतशिवारातील तारा हात पोहचेल एवढ्या खाली लांबलेल्या असून तारांणपासून जीवाला धोका आहे. या बाबत महावितरण या कडे त्वरित लक्ष घालावे असे छबिलाला पाटील,विरभान पाटील आदी शेतकऱ्यांनी ‘ठोस प्रहार’ शी बोलतांना सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button