अन्नधान्याचे तातडीने मदत वाटप करावे
रिपांइ सचिव संजयकुमार बनसोडे
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
सध्या जगभरात तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (covid 19) मुळे करणयात आलेल्या लाॅकडाऊन मुळे सवाॆंचीच परिस्थीत अंत्यत वाईट झाली असुन परंडा भिमनगर मधील (बैाध्द ) बांधव व बहुजन समाजाची परिस्थीत अत्यंत वाईट झाली असुन लाॅकडाऊन मुळे त्यांच्या हाताला काम नाही घराच्या बाहेर निघता येत नाहि तसेच मोलमजुरी करण्याच्या घरात अन्न , धान्य, पीठ, मिठ व जगण्यासाठी कुठलेच साधन नाही .तसेच अत्यंत गरिबीची परीस्थीती असल्यामुळे त्यांना जगणे कठीन झाले असुन या भागातील प्रत्येक कुटंबात ५ ते १० सदस्य असुन हाताला काम नाही . उपासमारीची वेळ आली आहे.शासन दरबारी न्याय देवून प्रत्येक काडॆ धारकाना विना मोबदला ५० किलो अन्य धान्य तातडीने वाटप करुन उपासमारीचे वेळ थाबांवावी.
अशी मागणी नायब तहसिलदार मिलींद गायकवाड यांना देण्यात आले निवेदनात केली आहे.
लाॅकडाऊन मुळे सर्वाचीच परिस्थीती अंत्यत वाईट झाली असुन रास्त दुकानावर ,रेशनवर सर्व रेशनकार्डधारकांना आधार कार्ड लिंकची, कुठलीही अट न लावता सर्व लाभार्थी रेशनकार्डधारकाला लिंक असो किंवा नसो तरी त्यांना धान्य देण्यात यावे असे नागरिकांतुन बोलले जात आहे.
यावेळी रिपाई(आठवले)राज्य सचिव संजयकुमार बनसोडे रिपाईचे जेष्ठ नेते गौतम पालके आदि उपस्थित होते.






