कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक संसाधनाचे प्रविण माने यांच्या कडुन वाटप.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान असून अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे.अर्थात हे संकट केवळ भारतावर नाही तर संपूर्ण जगावर आलेली ही आपत्ती असून ती तितकीच भयावह असल्याने सगळ्याच गोष्टींना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याचे चित्र आहे. मात्र अशातही मागचा पुढचा कुठलाही विचार न करता पोलिस प्रशासन व डाॅक्टरांची टीम अहोरात्र काम करत आहे. अशा वेळी त्यांच्या आरोग्याची काळजीही तितकीच महत्वाची आहे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील पळसदेव व बिजवडी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील आरोग्य डॉक्टर ,कर्मचारी, आशाताई व इतर कर्मचारी सॅनिटायझर, N95 मास्क, लूज सॅनिटायझर, व कापडी मास्कचे वाटप जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माने म्हणाले कि, २१ दिवसाचा लॉक डाऊन संपूर्ण देशभर असताना, घराबाहेर पडणाऱ्या व्यक्ती किंवा कोरोना संसर्ग बाधीत व्यक्तींची सेवा शुश्रूषा करण्यासाठी ग्राऊंड लेव्हलला, युध्द पातळीवर काम करणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी व आरोग्य सेवक व आशा सेविका या सर्वांच्या निरोगी स्वास्थ्याची काळजी घेणे हे देखील आपणा सर्वांचे काम आहे.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी, कार्य करणाऱ्या या साऱ्या देवदूतांचे मानावे तेवढे आभार व त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कोरोना विरुद्धच्या या लढाईत जनतेची सेवा करण्याच्या या कामाबद्दल जनता कायम या देवदूतांची ऋणी असेन, असे प्रतिपादन करत मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी या सर्व कर्मचारी बांधवांचे विशेष आभार मानले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ,डॉ. मिलिंद यादव,डॉ. विकास गार्डे,डॉ. सुवर्णा शिंदे, डॉ. प्रियंका जागाकोस, डॉ. जळमकर मॅडम, पर्यवेक्षक गणेश मोरे, सुपरवायझर अशोक कंबळे व इतर सहकारी मान्यवर उपस्थित होते.






