शहरातील सिंधी कॉलनीतील किराणा दुकानदाराने ‘सोशल डिस्टन्स’चा नियमांची पायमल्ली गुन्हा दाखल..
फहिम शेख
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीतील किराणा
दुकानदाराने ‘सोशल डिस्टन्स’चा नियमांची पायमल्ली केल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सुनील प्रोव्हिजन दुकानासमोर अनिलकुमार हिरालाल गोंगिया यांना
लेखी नोटीस देऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या किराणा दुकानाजवळ कोणत्याही प्रकारचे मार्किंग न करता ग्राहकांची गर्दी करून विक्री
केला.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संजय वळवी यांच्या फिर्यादीनुसार किराणा दुकानदार अनिलकुमार हिरालाल गोंदिया यांच्याविरुद्ध भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या अधिक तपास पोलीस हवालदार चौरे करीत आहेत.






